मुंबई - भारत आणि चीनचे संबंध 2020मध्ये टोकाचे ताणले होते. चीनकडून सिमेवर होणाऱ्या कारवाया भारताने परतलेल्या जरी असल्या तरी भारतावर चीनचे सायबर दहशतवादी डोळा ठेवून आहेत. मुंंबई महानगर क्षेत्रात चीनच्या सायबर हल्ल्यामुळे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याची शक्यता सायबर सेलने व्यक्त केली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली. तर हा वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनचा हात असल्याची शक्यता परदेशी प्रसारमाध्यमांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढील काळातही अशा स्वरुपाचे हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सायबर एक्सपर्ट आणि वकील प्रशांत माळी सांगतात की, भारतामध्ये पुन्हा असा सायबर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण भारतातील अन्य राज्यांच्या पॉवर हाऊसमध्येही चीनकडून आयात केलेल्या पॉवर इक्युमेंट लावल्या आहेत. तसेच त्यांच्या हार्डवेअरमध्ये चीनने पहिल्यापासूनच मालवेअरसारखे घातक सॉफ्टवेअर इंस्टॉल केले असेल. ते चीनमध्ये बसून ऑपरेट करु शकतात. त्यामुळे आपल्याला हे शोधून काढावे लागणार आहे.
हेही वाचा - मुंबईच्या ब्लॅक आऊटमागे चिनी सायबर हल्ला -अनिल देशमुख
याबाबत शैलेंद्र देवळाणकर काय म्हणाले?
चीनकडून आयात करुन भारताच्या क्रिटीकल इंफ्रास्ट्रक्चरमध्ये वापरली जाणाऱ्या साधनांमध्ये चीन आपले मालवेकरसारखे स्वॉफ्टवेअर वापरत असल्याचे म्हटले आहे. तसेच चीन यांचा वापर राजकीय फायद्यासाठी करत असल्याचेही आतंरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक देवळाणकर म्हणाले.
भारतातील क्रिटीकल इंफ्रास्ट्रक्चर कोणती ?
- टेलिकॉम सेक्टर
- रेल्वे
- इलेक्ट्रिसिटी
- परिवहन, हवाई क्षेत्र
- BSE
- वैद्यकीय क्षेत्र
- अति संवेदनशील संरक्षण क्षेत्रात हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.