ETV Bharat / state

खासदार राजीव सातव यांच्या निधनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया, वाचा...

सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. राजीव सातव यांच्यासारख्या निष्कलंक नेत्यांच्या जाण्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

author img

By

Published : May 17, 2021, 12:53 AM IST

politicians reactions on mp rajiv satav death
खासदार राजीव सातव यांच्या निधनावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया, वाचा...

मुंबई - काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. राजीव सातव यांच्यासारख्या निष्कलंक नेत्यांच्या जाण्यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • महाराष्ट्राने एक निर्भिड, प्रामाणिक नेतृत्व गमावले - चंद्रकांत पाटील

महाराष्ट्राचं उदयोन्मुख नेतृत्व ज्यांना राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण होती असे खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक निर्भिड, प्रामाणिक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या दिवंगत आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केले.

rajiv satav death
प्रतिक्रिया
  • सातव यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी हानी - नितीन गडकरी

युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवारास हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.

rajiv satav death
प्रतिक्रिया
  • पक्षसंघटनेसाठी आयुष्य वाहिलेल्या एका सच्चा कार्यकर्ता गमावला - यशोमती ठाकूर

महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनीही राजीव सातव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, 'राजीव सातव यांचं जाणं धक्कादायक आहे. पक्षसंघटनेसाठी आयुष्य वाहिलेल्या एका सच्चा कार्यकर्त्याला आपण मुकलो. माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसान आहे.'

प्रतिक्रिया
  • कॉंग्रेसमधील युवा नेतृत्वाचं जाणं दुःखद - प्रवीण दरेकर

कॉंग्रेसमधील युवा नेतृत्व, राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असून, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

प्रतिक्रिया
  • नव्या दमाचे अभ्यासु नेतृत्व आज देशाने गमावले - बच्चू कडू

एक नव्या दमाचे अभ्यासु नेतृत्व आज देशाने गमावले. खा. राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशा शब्दांत राज्यमंत्री बच्चू कडूंनी भावना व्यक्त केल्या.

rajiv satav death
प्रतिक्रिया
  • राजीव यांचं जाणं ही वैयक्तिक हानी - सचिन सावंत

खा. राजीव सातव यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. युवक काँग्रेसपासून आम्ही एकत्र व जवळ होतो. राजीवजींच्या यशाचा मी साक्षीदार होतो. माझा लहान भाऊ, मित्र,सहकारी व काँग्रेसचे उमदे नेतृत्व कोरोनाने हिरावून नेले. श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल वाटले नव्हते, असे म्हणत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.

rajiv satav death
प्रतिक्रिया
  • राजीवजींच्या जाण्यावर विश्वास बसत नाही - खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

काँग्रेसचे युवा नेते खासदार राजीव सातव यांचे आज दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आमचे राज्यसभेतील सहकारी राजीवजी आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंनी दुःख व्यक्त केले.

rajiv satav death
प्रतिक्रिया
  • उत्तम संसदपटू आणि माणुसकी जपणारा नेता गमावला - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली. त्या लिहितात, काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे.लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

rajiv satav death
प्रतिक्रिया
  • राजीव सातव यांच्या निधनाच्या बातमीनं धक्का बसलाय - मल्लिकार्जून खरगे

राजीव सातव यांच्या निधनाच्या बातमीनं मला धक्का बसलाय. ते एक उत्तम नेते होते आणि तरुणांना प्रेरणा द्यायचे, अशा शब्दांत मल्लिकार्जून खरगेंनी भावना व्यक्त केल्या.

rajiv satav death
प्रतिक्रिया
  • तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला - देवेंद्र फडणवीस

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली.

rajiv satav death
प्रतिक्रिया
  • काँग्रेसचे आदर्श मानणारा मित्र गमावला - राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातव यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, मी आज माझ्या मित्राला गमावलंय. राजीव सातव हे कॉंग्रेसच्या आदर्शांना मूर्त रूप देणारे नेते होते. त्यांचं जाणं हे काँग्रेससाठी कधीही न भरून निघणार नुकसान आहे.

rajiv satav death
प्रतिक्रिया
  • कोरोनातून बरे झाल्यानंतर झालं निधन - विश्वजित कदम

काँग्रेस आमदार आणि राज्यमंत्री विश्विजत कदम यांनी राजीव सातव यांच्या निधनाबद्दल माहिती दिली.

प्रतिक्रिया
  • काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रातील प्रमुख स्तंभ कोसळला - खासदार संजय राऊत

राजीव सातव यांच्या निधनावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजीव सातव यांच्या निधनाचा आघात केवळ काँग्रेस पक्षावरच नाही. तर त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय राजकारणामध्ये राजीव सातव हे महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व म्हणून गेल्या काही वर्षांपासून प्रस्थापित होत होते. सातव दुसऱ्या पक्षात असले तरीही सर्वांचे त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. पाच दिवसांपूर्वी झालेल्या व्हिडिओ कॉलमध्ये त्यांनी मला लवकर बरे होऊन भेटतो, असे सांगितले होते. मात्र, त्यांचं अचानक जाणं दुर्दैवी आहे. त्यांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्रातील प्रमुख स्तंभ कोसळला आहे, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया
  • काँग्रेसचा संसदरत्न हरवला - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

काँग्रेसने उत्तम संसदपटू आणि संसदरत्न गमावला आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

प्रतिक्रिया
  • जिद्द आणि चिकाटीने काम करणारा तरुण सहकारी गमवला - अशोक चव्हाण

आमचे सहकारी कॉंग्रेसचे नेते राजीव सातव यांचे पुण्यात निधन झाले. ही बातमी अत्यंत धक्कादायक, निराश करणारी आणि मनाला हेलका देणारी होती. राजीव सातव हे अत्यंत जिद्दी आणि धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांनी अल्पावधीतच जिल्हा पातळीपासून राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटावला. कॉंग्रेस पक्षामध्ये अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने काम करणारा तरुण सहकारी आमच्यामधून गेल्याची खंत आहे. अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया
  • सातव यांच्या जाण्यानं वैयक्तिक नुकसान, तर पक्षाची कधीच भरून न निघणारी हानी - भाई जगताप

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सातव यांच्या जाण्यानं वैयक्तिक नुकसान झाल्याचं ते म्हणाले.

प्रतिक्रिया
  • सातव कायम आमच्यासोबत राहतील - सतेज पाटील

कोल्हापुर- खासदार राजीव सातव हे तरूणांचे सहकारी होते. त्यांच्या जाण्याने माझ्यासह राज्याचे, काँग्रेस पक्षाचे नुकसान आहे. ते गेल्याचे दुःख मला आम्हा सर्वांना आहे. ते नेहमीच आमच्या सोबत राहतील अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया
  • राजीव सातव यांच्या निधनाच्या वृत्ताने व्यथित - राज्यपाल कोश्यारी

खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तरुण व तडफदार खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजून व्यथित झालो. ते कोरोनावर मात करून लवकरच बाहेर येतील असे वाटत असतानाच ही दुखद बातमी आली. सातव यांच्याकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेले नेते आपल्यातून हिरावून नेले आहे.

  • काँग्रेसचे महत्वपूर्ण नेते आपल्यातून निघून गेले - नवाब मलिक

राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक; मुख्यमंत्र्यांकडून राजीव सातवांना श्रध्दांजली

प्रतिक्रिया
  • निष्ठावान, कर्तृत्ववान, अभ्यासू नेता राज्यानं गमावला - नाना पटोले

खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक तरुण, निष्ठावान, कर्तृत्ववान, अभ्यासू, प्रचंड क्षमता असलेला उमदा नेता गमावला असून काळाने माझा भाऊ हिरावून घेतला आहे. अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

  • राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक आहे, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते. संसदीय प्रणालीवर दृढ विश्वास असणारे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबावर, पक्षावर मोठा आघात आहे. तो सहन करण्याची शक्ती सातव कुटुंबियांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खासदार राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली', असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, खासदार राजीव सातव यांचे पार्थिव हेलिकॉप्टर ऐवजी ॲम्बुलन्सद्वारे कळमनुरीत दाखल होणार आहे. ही ॲम्बुलन्स पुण्याहून निघाली असून ती सध्या औरंगाबाद नजिक आहे. त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. ही माहिती पार्थिवासोबत असलेल्या कार्यकर्त्यांकडून मिळाली.

  • काँग्रेस पक्षाने उमदा नेता गमावला - डॉ. नितीन राऊत

'हिंगोलीसारख्या मागास भागातून काँग्रेस पक्षाचा एक युवा कार्यकर्ता म्हणून राजकारणाची सुरूवात करणाऱ्या काँग्रेसचे सरचिटणीस तथा खासदार राजीव सातव यांनी अवघ्या काही वर्षांतच आपली देश पातळीवर एक वेगळी प्रतिमा तयार केली होती. त्यांच्या निधनाने काँग्रेसचे युवा नेतृत्व हरवले आहे', अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रतिक्रिया
  • राजीव सातवांच्या जाण्याने मोठी हानी- रावसाहेब दानवे

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिवंगत खासदार राजीव सातव यांना श्रध्दांजली वाहिली आहे. 'राजीव सातव यांच्या जाण्याने केवळ काँग्रेस पक्षाचीच हानी झाली असे नाही, तर आमच्या मित्रपरिवाराचीही फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो. मी व माझ्या कुटुंबाच्या वतिने राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करतो', असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया
  • दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला - पंकजा मुंडे

'दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला आहे. सर्व सामान्य समाजासाठी धडपडणारा एक तरूण, उमदा युवा नेता राजीव सातव यांच्या रूपाने आज आपण गमावला आहे. त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे', असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.