ETV Bharat / state

Chhath Puja 2022: छठ पूजेच्या निमित्ताने उत्तर भारतीय मतदारांवर राजकारण्यांचा डोळा? - Politicians eye North Indian voters

Chhath Puja 2022: दीपावली पाठोपाठ मुंबईत ३० ऑक्टोबरला होणाऱ्या छठपूजेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी करण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये विशेष करून भाजप व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असून उत्तर भारतीयांना आपलेसे करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray पक्षाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाणार आहेत.

Chhath Puja 2022
Chhath Puja 2022
author img

By

Published : Oct 21, 2022, 10:18 PM IST

Updated : Oct 22, 2022, 2:44 PM IST

मुंबई: दीपावली पाठोपाठ मुंबईत ३० ऑक्टोबरला होणाऱ्या छठपूजेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी करण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये विशेष करून भाजप व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असून उत्तर भारतीयांना आपलेसे करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray पक्षाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाणार आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस व भाजपमध्ये रस्सीखेच येत्या काही महिन्याच्या कालावधीमध्येच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी आता दहीहंडी, गणपती, नवरात्री व साजऱ्या होणाऱ्या दीपावली पाठोपाठ छठ पूजेच्या आयोजनाची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. मुंबईत ३० ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणामध्ये छठपूजा साजरी होणार आहे. या छठ पूजेच्या निमित्ताने उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबईत जवळपास ८० ठिकाणी छटपूजेच आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये जुहू व कुलाबा येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या ठिकाणी विशेष करून जुहू चौपाटीवर छठ पूजेचे आयोजन पूर्वीपासून काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम हे मोठ्या प्रमाणामध्ये करत आले आहेत. परंतु मागील काही वर्षापासून काँग्रेसकडील छठ पूजेचं महत्त्व कमी करत त्यांच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात गर्दी खेचण्याचं काम छठ पूजेच्या निमित्ताने आता भाजपकडून करण्यात येत आहे.

आम्ही छठपूजेची संस्कृती पुढे घेऊन जात आहोत- बावनकुळे यंदा राज्यात नाट्यमय सत्तातरानंतर पहिल्यांदा छठ पूजा साजरी होत असताना ती अगोदर साजरा करण्यात आलेल्या दहीहंडी, गणपती, नवरात्री व आताची दीपावली या सणांपेक्षा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. याकडे शिंदे- फडवणीस सरकार जातीने लक्ष देऊन आहे. या निमित्ताने उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. भाजपने यासाठी मोठ्या प्रमाणात छठ पूजेचा आयोजन केलं असून याची संपूर्ण जिम्मेदारी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे आहे.

छठ पूजेच्या निमित्ताने उत्तर भारतीयांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप मविआकडून केला जात आहे. या आरोपाला उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही छठपूजेची जी संस्कृती आहे. ती पुढे घेऊन जात आहोत. आम्ही सर्व धर्मीयांना एकच मानतो. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस काय करत आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेस नेते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय करत आहेत. चाकूरकर श्रीकृष्णाच्या उपदेशाला जिहाद म्हणतात. हे तुम्ही काय करत आहात ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही छठपूजा साजरी करूच परंतु सरकारनेही ती मोठ्या प्रमाणात साजरी करावी, अशी अपेक्षाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे BJP state president Chandrasekhar Bawankule यांनी व्यक्त केली आहे.

मनसेची नरमाईची भूमिका ? एकेकाळी छठ पूजेला कडाडून विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा मात्र आता हा विरोध मावळलेला आहे. राज्यात शिंदे- फडवणीस सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेबरोबर त्यांची जवळीक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यापूर्वी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने मुंबई छठ पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याला कडाडून विरोध केला होता. त्यावेळी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या मनसेला पहिल्यांदाच घवघवीत यश संपादन झाले होते. छटपूजेच्या निमित्ताने बिहारींची राजकीय ताकद उभारण्याच्या उद्योगाला राज ठाकरे यांनी तेव्हा मनसेस्टाईल विरोध केला होता. परंतु यंदा हा विरोध मावळला असून राज्यातील समीकरण बदलताना दिसत आहेत.

छठपूजेसाठी चोख व्यवस्था मुंबईत होणाऱ्या छठ पूजेसाठी भाविकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. याबाबत त्यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. छटपूजेत सहभागी होणाऱ्या भाविकांना विशेषतः महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. सुटसुटीत पार्किंग, प्रकाश व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह, वाहतूक व्यवस्था, आपत्कालीन स्थितीत कोस्टल सेफ गार्ड, जागोजागी सूचनाफलक, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख असावा आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व सूचनांचे पालन व्हावे, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत सर्व विभागांच्या प्रमुखांना दिले आहेत.

मद्य विक्री बंद मुंबईतील जुहू येथील समुद्रकिनारी दरवर्षी छठपूजा उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी दिनांक ३० आणि ३१ ऑक्टोंबर रोजी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था सुरलीत ठेवण्यासाठी मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जुहू पोलीस स्टेशन व सांताक्रुज पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्याची दुकाने 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते ३१ ऑक्टोंबर रोजी च्या मध्यरात्री १:३० वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Last Updated : Oct 22, 2022, 2:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.