ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : 'जीवनाच्या लढाईत तू हरलीस तरी न्यायाच्या लढाईत महाराष्ट्र तुझ्यासोबत' - हिंगणघाट प्राध्यापिका जळीतकांड

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.

Hinganghat Burn Victim Teacher Death
Hinganghat Burn Victim Teacher Death
author img

By

Published : Feb 10, 2020, 9:59 AM IST

Updated : Feb 10, 2020, 3:14 PM IST

मुंबई - वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात 6 वाजून 55 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. पीडितेवर उपचार करणारे डॉ. राजेश अटल यांनी मेडिकल बुलेटिन घेऊन तिच्या मृत्यूची बातमी सांगितली. गेल्या सात दिवसांपासून पीडिता मृत्यूशी झुंज देत होती. यावर नेत्यांनी दुःख व्यक्त केले असून पीडितेच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.

हिंगणघाट जळीतकांड : 'जीवनाच्या लढाईत तू हरलीस तरी न्यायाच्या लढाईत महाराष्ट्र तुझ्यासोबत'

सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले दुःख ...
अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात होतेय. पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती. या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

जितेंद्र आव्हाड...

हिंगणघाट प्रकरणातील ताईचा आज मृत्यू झाला. जीवनाच्या लढाईत जरी तू हरली असलीस, तरी तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागून तिला न्याय मिळेल तेव्हाच तिला ती योग्य श्रद्धांजली ठरेल.

जयंत पाटील...
हिंगणघाट येथील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. दिवसाची सुरुवात या दुर्दैवी बातमीने होत आहे याचं दुःख वाटतं. भावपूर्ण श्रद्धांजली!

अशोक चव्हाण -
मनाला चीड आणणारी अशी ही घटना आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यायला हवा. तसेच देशभरात आश्या प्रकारच्या घटनांचा जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना फाशीची देण्यात आली पाहिजे, तरच लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर बसेल आणि गुन्हेगारांना भीती राहील, असे ते म्हणाले.

शिवसेना प्रवक्त्या, आमदार - डॉ. मनीषा कायंदे
दया याचिका बंद झाली पाहिजे, याबाबत मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र फास्ट ट्रक कोर्ट व्हावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. दिल्लीतील निर्भयाला 7 वर्ष झाले तरी न्याय मिळाला नाही. या पीडितेला तरी न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे, असे कायंदे म्हणाल्या.

महिला बालकल्याण मंत्री, यशोमती ठाकूर -
हिंगणघाट प्रकरणातीलती मुलगी आज आपल्यातून निघून गेली. माझ्यातली आई निशब्द झाली आहे. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नसून जे कृत्य घडलं ते राक्षसी होतं. या राक्षसी कृत्याला समाजात मोठी शिक्षा मिळाली पाहिजे. अपराध्याला शिक्षा मिळेल तेव्हाच त्या मुलीच्या आत्म्याला शांती लागेल. अशी कृत्य पुन्हा घडू नये यासाठी सरकार एक नियोजन आखणार आहे. जेणेकरून मुला-मुलींना याविषयीचं त्यातून शिक्षण मिळेल. अपराध्याला शिक्षा मिळेल यासाठी शासन कटिबद्ध आहे. लवकरात लवकर त्याला शिक्षा मिळावी, यासाठी शासन प्रयत्न करत आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

विधानपरिषदेच्या उपसभापती, नीलम गोऱ्हे -
महिलांच्या सुरक्षिततेबाबत लवकरच गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारी वकिलाची नेमणूक ते करतील. अशा घटनांना बळी पडलेल्या मुलींच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. पीडित कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण महाराष्ट्र सहभागी असल्याचे त्या म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटमधील नांदोरी चौकात ३ फेब्रुवारीला (सोमवारी) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीला आरोपी विकी नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे हिंगणघाट हादरून गेले होते. गेल्या सात दिवसांपासून पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच पीडितेची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान तिच्यावर चार वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पीडितेचा रक्तदाब नियंत्रणात नसल्याने तिला श्वसनाला त्रास होत होता. त्यानंतर तिला व्हेंटीलेटरवर ठेवले होते. रविवारी तिच्यावर चौथी शस्त्रक्रीया केल्यानंतरही तिची प्रकृती खालावतच होती. सोमवारी (दि 10) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडितेला ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर डॉक्टर तिच्यावर उपचार करत असताना सकाळी 6 वाजून 55 मिनीटांनी तिचा मृत्यू झाला.

Intro:Body:

पीडेतेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी : सुप्रिया सुळेंची मागणी, राज्यातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात 6 वाजून 55 मिनिटांनी  अखेरचा श्वास घेतला. पीडितेवर उपचार करणारे डॉ. राजेश अटल यांनी मेडिकल बुलेटिन घेऊन तिच्या मृत्यूची दुःखद बातमी सांगितली. गेल्या सात दिवसांपासून पीडिता मृत्यूशी झुंज देत होती. यावर  नेत्यांनी दुःख व्यक्त केले असून पीडीतेच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले दुःख ...

अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होतेय. पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

जितेंद्र आव्हाड...

हिंगणघाट प्रकरणातील ताईचा आज मृत्यू झाला.जीवनाच्या लढाईत जरी तू हरली असलीस तरी तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे.या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागून जेंव्हा तिला न्याय मिळेल तेंव्हाच तिला ती योग्य श्रद्धांजली ठरेल.

जयंत पाटील...

हिंगणघाट येथील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. दिवसाची सुरुवात या दुर्दैवी बातमीने होत आहे याचं दुःख वाटतं. भावपूर्ण श्रद्धांजली!

Conclusion:
Last Updated : Feb 10, 2020, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.