ETV Bharat / state

BRS Maharashtra : 'या' कारणामुळे महाराष्ट्रातील माजी आमदार बीआरएसमध्ये घेत आहेत प्रवेश - भारत राष्ट्र समिती

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात राज्यातील माजी आमदार मोठ्या प्रमाणावर जाताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नेमकी काय उलथापालथ होऊ शकते? बीआरएसला किती प्रतिसाद मिळेल? का जात आहेत आमदार बीआरएसमध्ये? याबाबत राजकीय विश्लेषकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्या आपण जाणून घेवू या.

MLA joins BRS
राजकीय विश्लेषकांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 15, 2023, 10:19 AM IST

राजकीय विश्लेषकांची प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे आता हळूहळू बदलताना दिसू लागली आहेत. विदर्भ मराठवाड्यातील अनेक माजी आमदार तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षाकडे वळताना दिसत आहेत. राज्यातील अनेक माजी आमदारांनी चंद्रशेखर राव यांच्याशी संपर्क साधला आहे. राज्यातील विविध बड्या पक्षांचे नेते केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीत नेमके का जात आहेत, यामुळे राज्यातील राजकारणामध्ये काय फरक पडू शकेल? याविषयी जाणकारांसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, बीआरएस या पक्षाने महाराष्ट्रात जरी तात्पुरती मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला असला तरी ही निवडणुकीपूर्वीची गणिते आहेत. निवडणुका जवळ येतील, तसेच चित्र वेगळे असू शकते मात्र बीआरएसला फार काही पाय रोवता येईल, असे चित्र नाही.

शेतकऱ्यांना मोफत वीज पाण्याची घोषणा : तेलंगणा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणामध्ये जे काही प्रयोग केले, ते अभूतपूर्व प्रयोग आहेत. त्यांचा प्रचंड गाजावाजा होत आहे. शेतीला मोफत वीज आणि मोफत पाणी या दोन गोष्टींमुळे महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. म्हणूनच अनेक माजी आमदार आज प्रामुख्याने केसीआर यांच्या भारत पक्षामध्ये सहभागी होत आहेत. माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. त्यांना असे वाटते, के सी आर यांच्या योजनांमुळे शेतकरी आकर्षित होतील. त्यांना मतदान देऊन निवडून आणतील. या एकाच कारणासाठी हे लोक आज त्यांच्याकडे जात आहेत.

राजकीय अस्तित्वासाठी पक्षांतर : खरे म्हणजे स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे लोक केसीआर यांच्याकडे जात आहेत. महाराष्ट्रमध्ये आज त्यांना विचारणार कोणीच नाही, म्हणून आज केसीआरकडे जाणारा ओघ आहे, हा कालांतराने थांबेल. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये काय निकाल लागला असेल, हे आपल्याला पहावे लागेल. मात्र केसीआर यांच्या पक्षाला महाराष्ट्रात फार स्थान मिळेल, अशी परिस्थिती नाही. यापूर्वी एमआयएमने हा प्रयोग करून पाहिला, पण त्यांना यश आले नाही अशी प्रतिक्रिया जेष्ठ राजकीय विश्लेषण विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.

मतांवर बीआरएसचा डोळा : दरम्यान या संदर्भात बोलताना राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड म्हणतात की, राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी राज्याबाहेरील पक्ष नेहमीच टपून बसलेले असतात. यापूर्वी एमआयएमने नांदेडमधून महाराष्ट्रात प्रवेश करीत आपले दोन आमदार आणि एक खासदार निवडून आणले. अलीकडे एमआयएमचा फारसा प्रभाव नसला तरी एमआयएमने घालून दिलेल्या आदर्शावरती आता केसीआर यांची भारत राष्ट्र समिती हा पक्ष चालतो आहे. मराठवाडा हा नेहमीच निजामशाही आणि दक्षिणेतील आंध्र कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांची जवळीक असलेला भूभाग आहे. भौगोलिक सलगता आणि रोटी बेटीचे व्यवहार सुद्धा याला कारणीभूत आहेत. या राज्यांशी महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमधील जनतेची असलेली जवळीक आणि या भागात असलेली राजकीय अस्थिरता पाहता या ठिकाणी पाय पसरण्यास वाव असल्याचे बीआरएसच्या लक्षात आले आहे. त्यानुसारच आता शेतकरी अल्पसंख्याक आणि दलित मतांवर डोळा ठेवून बीआरएस वाटचाल करीत आहे.

योजनांचा प्रभाव : शेतकऱ्यांसाठी त्यांनी राबवलेल्या योजना आणि त्याचा प्रभाव या राज्यातील शेतकऱ्यांवर आणि या घटकांवर पडला आहे. त्यामुळे त्यांना या ठिकाणी पाय रोवायला संधी आहे, असे वाटते आहे. त्यानुसारच त्यांनी या जिल्ह्यांमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि अन्य पक्षांच्या माजी आमदारांना आपल्या गळाला लावले आहे. या आमदारांनाही सध्या राजकीय दृष्ट्या बीआरएस सारखा पर्याय समोर असल्याने त्यांनी हा पर्याय आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी निवडला असावा,ही दाट शक्यता आहे. मात्र, बीआरएसला किती प्रमाणात लोक स्वीकारतात? हे आगामी निवडणुकीनंतर समजेल असेही गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. BRS : भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात, विदर्भाकडे असणार सर्वाधिक लक्ष
  2. Ashadhi Wari 2023 : के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीकडून दिवेघाटात बॅनरबाजी; पक्ष वाढविण्याकरिता प्रयत्न
  3. Maharashtra Politics: बीआरएसचे एमआयएमच्या पावलावर पाऊल; बीआरएस भाजपाला अप्रत्यक्षपणे मदत करणारा पक्ष ठरणार का? राजकीय विश्लेषक म्हणतात...,

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.