मुंबई : महाराष्ट्र पोलीस अधिनियम अनुसार भारतीय आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि प्रतीक्षेत असलेल्या एकूण 109 अधिकाऱ्यांना आज गृह विभागाने पदस्थापना दिली ( Police officers transfers order ) आहे. त्यानुसार सोलापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejashwi Satpute ) यांची नेमणूक मुंबई शहर उपायुक्त पदी करण्यात आली आहे. तर मनोज पाटील यांचीही तेथेच बदली करण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांच्या बदल्या - सोलापूर शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे यांची ठाणे ग्रामीणच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. तर बापू बांगर यांची साताऱ्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य स्वप्ना गोरे यांची बदली पिंपरी चिंचवड येथे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे.
पोलीस अकादमीच्या अधिक्षकपदी यांची वर्णी - पालघरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड आणि नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या पोलीस अधीक्षिका दिपाली काळे यांची सोलापूर शहर पोलीस उपायुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे.