ETV Bharat / state

२६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला पकडणारा पोलीस अधिकारी निलंबित

अजमल कसाबला पकडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या संजय गोविलकर या अधिकाऱ्याला मुंबई पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक सोहेल भामला याला मुंबई विमानतळावरून पलायन करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली हे निलंबन करण्यात आले आहे.

author img

By

Published : Aug 10, 2019, 5:03 PM IST

Updated : Aug 10, 2019, 7:09 PM IST

संजय गोविलकर , निलंबित पोलीस अधिकारी

मुंबई- 26 11 ला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अजमल कसाब या अतिरेक्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले होते. अजमल कसाबला पकडण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या संजय गोविलकर या अधिकाऱ्याला मुंबई पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक सोहेल भामला याला मुंबई विमानतळावरून पलायन करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली हे निलंबन करण्यात आले आहे. संजय गोविलकर यांच्याबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे या अधिकाऱ्याला सुद्धा निलंबित करण्यात आले आहे .

हे दोन्ही अधिकारी सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होते. 2004 मध्ये बनावट नोटांच्या प्रकरणांमध्ये सोहेल भामला याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याचबरोबर मुंबईतील जुहू परिसरांमध्ये एका व्यापाऱ्याला बंगला खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल केला होता.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये असलेल्या सोहेल भामलाला फरार घोषीत केले होते. दाऊद इब्राहिमच्या या खास हस्तकाला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून लूक आऊट नोटीस सुद्धा जारी करण्यात आली होती.

दुबईहून मुंबईत आलेल्या सोहेल भामला याला काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर आल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. या संदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे माहिती दिल्यानंतर हे दोन्ही अधिकारी मुंबई विमानतळावर दाखल झाले होते.

मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्यानंतर सोहेल भामला याला आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी त्याची चौकशी करून अटक न करता त्याला सोडण्यात आले होते. याचा परिणाम सोहेल भामला हा देश सोडून पळून गेला. यासंदर्भात मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी यासंदर्भात कडक कारवाई करत या दोन्ही अधिकार्‍यांना निलंबित केले आहे .

26 /11 ला मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या वेळेस शहीद झालेले तुकाराम ओंबळे यांच्या सोबत संजय गोविलकर हे अधिकारी सुध्दा हजर होते. या शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित केले होते. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत संजय गोविलकर आणि त्यांच्या सहकारी जितेंद्र शिंगोटे यांनाही नोकरीतून निलंबित करण्यात आले आहे.

Intro:26 11 च्या मुंबईवर झालेल्या आत्मघाती हमला च्या वेळेस अजमल कसाब याला पकडण्यात मध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या संजय गोविलकर या अधिकाऱ्याला मुंबई पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आलेला आहे. निलंबन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक सोहेल भामला लायला मुंबई विमानतळावरून मुंबई विमानतळावरून पालन करण्यास मदत करण्याच्या आरोपाखाली करण्यात आलेला आहे संजय गोविलकर यांच्याबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे या अधिकाऱ्याला सुद्धा निलंबित करण्यात आल आहे .Body:हे दोन्ही अधिकारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये सध्या कार्यरत होते .2004 मध्ये बनावट नोटांचा प्रकरणांमध्ये सोहेल भामला याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता त्याचबरोबर मुंबईतील जुहू परिसरांमध्ये एका व्यापाऱ्याला बंगला विकण्याच्या संदर्भात सुद्धा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलेला होता.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये सोहेल भामला याचं नाव होतं दाऊद इब्राहिमच्या या खास हस्तकला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून लूक आऊट नोटीस सुद्धा चारी करण्यात आली होती.

याप्रकरणी दुबईहून मुंबईत आलेल्या सोहेल भामला याला काही दिवसांपूर्वी दुबईहून मुंबई विमानतळावर आल्यानंतर सोहेल भामला याला मुंबई विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी रोखून धरले होते.या संदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे माहिती दिल्यानंतर हे दोन्ही अधिकारी मुंबई विमानतळावर दाखल झाले होते
मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्यानंतर सोहेल भामला याला आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. या ठिकाणी त्याची चौकशी करून अटक न करता त्याला सोडण्यात आले होते. याचा परिणाम सोहेल भामला हा देश सोडून पळून गेला. यासंदर्भात मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी यासंदर्भात कडक कारवाई करत या दोन्ही अधिकार्‍यांना निलंबित केला आहे .Conclusion:26 /11 च्या वेळेस मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या वेळेस शहीद झालेले तुकाराम ओंबळे यांच्या सोबत संजय गोविलकर हा अधिकारी हजर होता. राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित केलेल्या या अधिकाऱ्याला त्याच्या कामातील दिरंगाईमुळे नोकरीतून निलंबित करण्यात आल आहे.
Last Updated : Aug 10, 2019, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.