मुंबई: शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात एका सात वर्षे वयाच्या चिमुकल्याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार शिवाजी नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. प्राप्त झालेल्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून शिवाजी नगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी शिवाजी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक, गुंडा पथक, निर्भया पथक, मिसींग पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांची पाच पथके तयार केली. या पाच पथकांनी सलग 24 तास तपास करून संशयित गुन्हेगारास ताब्यात घेतले. नंतर तपास कौशल्याचा योग्य वापर करत सात वर्षांच्या मुलास ठाण्यातील नालासोपारा भागातून ताब्यात घेतले आणि त्याची सुखरूप सुटका केली. यानंतर चिमुकल्याला त्याच्या आई-वडिलांकडे स्वाधीन करण्यात आले. अपहरण केलेला मुलगा सापडल्याने आई-वडिलामी पोलिसांचे आभार मानले आहेत.
या पोलिसांनी बजावली कामगिरी: या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यस्था ) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ६ हेमराजसिंह राजपूत, देवनार विभाग, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर पोलीस ठाण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने, पोलीस निरीक्षक खाटपे, पोलीस निरीक्षक सुधाकर कांदेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत हातीम, पोलीस उपनिरीक्षक बाबू बेले, पोलीस उपनिरीक्षक माणिक जाधव आणि कळवणकर, महिला पोलीस उपनिरीक्षक रेखा दिघे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार किशोर विचारे, बिरूदेव शिंदे, प्रविण शिंदे, इंद्रजित वाक्षे, पोलीस अंमलदार किरण मोरे, महेश घारे, राहुल खिल्लारे, राहुल सुतार, गणेशकुमार कुंभार, प्रविण माने, रोहित बाड, जिवराज बाबर, सोमनाथ सुळ, विशाल धनावडे यांनी केला आहे.