मुंबई : पोलिसांवरील ताण-तणावाची चर्चा नेहमीच होते. प्रत्यक्षात ताण-तणावामुळे कर्मचाऱ्यांचे मृत्यूदेखील होतात. अर्थसंकल्पाच्या अधिवेशनादरम्यान कार्यरत असल्याचे पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाल्याने पोलिसांमधील ह्रदयविकाराच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.
सांताक्रुझ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुजित पवार यांना आझाद मैदान येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन बंदोबस्त ड्युटी देण्यात आली होती. कामावर असताना दुपारी पावणे एकच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. ही माहिती समजताच सहकाऱ्यांनी त्यांना गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत कमालीचा उशीर झाला होता. डॉक्टरांनी बोबडे यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्ताचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन : गेल्या आठवड्यात यलो गेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) नितीन बोबडे यांचे ५५ व्या वर्षी निधन झाले. ते पोलीस कार्यालयात असतानाच दुपारी 2 ते 4 वाजताच्या सुमारास सेवेत असतानाच त्यांचे निधन झाले. ते एसीपी नितीन बोबडे सकाळी 10 वाजताच्या सुमारास कर्तव्यावर हजर झाले होते. दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान बोबडे यांनी जेवण केल्यानंतर ते आपल्या कक्षात विश्रांती घेत होते. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज आला होता.
पेट्रोलिंग करताना पोलीस शिपायाचा मृत्यू : दुसरीकडे पेट्रोलिंग करत असताना पोलिस वाहनावर कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना मुलुंड येथे घडली होती. रामा महाले (48) असे शिपायाचे नाव होते. ते मुलुंड पोलिस ठाण्यात मोबाईल वाहनावर चालक म्हणून सेवेत होते. मुलुंड परिसरात गस्त घालत असताना अचानक रामा महाले यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर उलटी झाली. सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना परिसरातील अगरवाल रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मृत्यू झाला होता.
चालू अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेत- अधिवेशनात शीतल म्हात्रे यांचा व्हायरल व्हिडिओ, अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत, अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न असे विविध मुद्दे गाजलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली असली तरी किसान लाँग मार्च अद्याप पूर्णपणे स्थिगीत झालेला नाही.