ETV Bharat / state

प्रेयसीसोबत झालं भांडण; मुंबई पोलीस कॉन्स्टेबलने संपवलं जीवन

Police Suicide Case : वरळी पोलीस वसाहतीतील अभ्यासिकेत २७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलने रविवारी रात्री आत्महत्या (Police Constable Committed Suicide) केली. आत्महत्येपूर्वी पोलीस कॉन्स्टेबलने त्याच्या एका प्रेयसीला गळफास घेत असल्याचा फोटो पाठवला होता.

Suicide Case
कॉन्स्टेबलने केली आत्महत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 20, 2023, 9:54 PM IST

Updated : Nov 20, 2023, 10:13 PM IST

मुंबई Police Suicide Case : वरळी पोलीस वसाहतीतील अभ्यासिकेत गफळास पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या (Police Constable Committed Suicide) केली. आत्महत्येपूर्वी पोलीस कॉन्स्टेबलने त्याच्या एका मैत्रिणीला गळफास घेत असल्याचा फोटो पाठवला होता. प्रेयसीशी झालेल्या भांडणानंतर (Dispute With Girlfriend) त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात (Worli Police Station) अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इंद्रजीत साळुंखे (वय २७) असे मृत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो स्थानिक सशस्त्र पोलीस दलात भोईवाडा येथे कार्यरत होता.

मैत्रिणीला पाठवला फासाचा फोटो : वरळी येथील पोलीस स्विमिंग पूलशेजारी असलेल्या अभ्यासिकेच्या खिडकीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईतील वरळी परिसरात एका पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या मैत्रीणीशी झालेल्या भांडणानंतर आत्महत्या केल्याची माहिती वरळी पोलिसांनी सोमवारी दिली. आत्महत्येची घटना रविवारी रात्री साडे दहा वाजता घडली होती. त्याच्या मृत्यूच्या काही क्षण आधी, कॉन्स्टेबलने कथितपणे त्याच्या मैत्रिणीला फासाचा फोटो पाठवला आणि तिला कळवलं की, तो गळफास लावून जीवन संपवणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

इतर महिलांशी करत होता चॅट : मृत पोलिसाचे गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर प्रेम होते. अशी चर्चा आहे की, मृत पोलीस कॉन्स्टेबल इंस्टाग्रामवर इतर महिलांशी चॅट करत असे. त्यामुळे त्या दोघांत भांडण झाले होते. भांडणानंतर, कॉन्स्टेबलने टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली. वरळी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्याचे पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे गोरेगाव जिल्ह्यात राहणाऱ्या एका महिलेवर प्रेम होते. दोघेही याच वर्षी एप्रिलपासून रिलेशनशिपमध्ये होते. प्रेयसीने मृतावर इंस्टाग्रामवर इतर महिलांशी बोलत असल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच दोघांमध्ये हाणामारी झाली. प्रेयसीला दादर रेल्वे स्थानकावर सोडून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी साळुंखे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून मृत पोलिस कर्मचाऱ्याच्या भावाचा जबाब नोंदवला आहे. या जबाबात कोणावरही आरोप केले नाही आणि त्याने कोणावरही संशयही घेतला नाही. पोलिसांनी या घटनेबाबत अपमृत्यूचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा -

  1. युक्रेनमधील महिलेशी अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची आत्महत्या; ठाण्यातून आरोपी पतीला अटक
  2. व्हॉट्सअपवरून झाला वाद; तरुणाने केली आत्महत्या
  3. Police Constable Suicide : पोलीस कॉन्स्टेबलची राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या, आत्महत्येचे कारण काय?

Last Updated : Nov 20, 2023, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.