ETV Bharat / state

ऐकावे ते नवलच ! मुंबईत व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या दोघांना अटक; उलटीची किंमत ऐकून व्हाल थक्क..

हा पदार्थ व्हेल माशाच्या आतड्यात तयार होतो. अंबरग्रीस हा खूप किमती पदार्थ आहे. याचा वापर सुगंधी द्रव्ये तसेच औषधे बनवण्यासाठी केला जातो.

अंबरग्रीस
author img

By

Published : Jun 18, 2019, 7:30 PM IST

Updated : Jun 18, 2019, 11:58 PM IST

मुंबई - घाटकोपर पोलिसांनी प्रतिबंधित अशा व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून १ किलो १३० ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १ कोटी ७० लाख रुपये आहे. अंबरग्रीस हा खूप किमती पदार्थ आहे. याचा वापर सुगंधी द्रव्ये तसेच औषधे बनवण्यासाठी केला जातो.

पोलिसांनी जप्त केलेला अंबरग्रीस पदार्थ

हा पदार्थ व्हेल माशाच्या आतड्यात तयार होतो. जेव्हा व्हेल मासा उलटी करतो तेव्हा हा पदार्थ त्याच्या शरीरातून बाहेर सोडला जातो. अत्तर बनविणाऱ्या कंपन्या या अंबरग्रीससाठी मोठी रक्कम मोजण्यासाठी तयार असतात.

अंबरग्रीस विकण्यासाठी १५ जून रोजी ६ वाजता विद्याविहार कामालेन येथे एक व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे घाटकोपर पोलिसांनी आणि वन विभागाने सापळा रचून राहुल कृष्णाजी दुपारे (वय ५३ रा. नागपूर) यास अटक केली.

आरोपीाच्या ताब्यातील अंबरग्रीसचे वजन १ किलो १३० ग्रॅम असून याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १ कोटी ७० लाख आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुसरा आरोपी ललित व्यास यासही अटक केली असून तो गुजरातचा रहिवासी आहे. घाटकोपर पोलिसांनी २ आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय व्यवहार आहे का?याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:

मुंबईत व्हेल माश्याची उलटी विकणाऱ्या दोघांना अटक

घाटकोपर पोलिसानी 15 जून ला प्रतिबंधित अशा व्हेल जातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्री साठी आलेल्या दोघांना उलटीच्या दगड सह अटक केली आहे.याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 1 कोटी 70 लाख रुपये आहेBody:

मुंबईत व्हेल माश्याची उलटी विकणाऱ्या दोघांना अटक

घाटकोपर पोलिसानी 15 जून ला प्रतिबंधित अशा व्हेल जातीच्या माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्री साठी आलेल्या दोघांना उलटीच्या दगड सह अटक केली आहे.याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 1 कोटी 70 लाख रुपये आहे .

अंबरग्रीस हा खूप किंमती पदार्थ आहे. याचा वापर सुगंधी द्रव्य तसेच औषधी बनवण्यासाठी केला जातो. उल्लेखनीय म्हणजे, हा पदार्थ व्हेल माशाच्या शरीरातच तयार होतो... आणि जेव्हा व्हेल मासा उलटी करतो तेव्हा हा पदार्थ त्याच्या शरीरातून बाहेर पडतो. परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या या अंबरग्रीससाठी मोठी रक्कम मोजण्यासाठीही तयार असतात.

अंबरग्रीस विकण्यासाठी 15 जून रोजी 6 वाजता विद्याविहार कामालेन येथे एक व्यक्ती येणार असल्याची माहिती पोलिसाना मिळाली त्या आधारे घाटकोपर पोलिसानी वन विभागाने साहाय्याने सापळा रचून राहुल कृष्णाजी दुपारे वय 53 रा नागपूर यास अटक करून त्याच्या ताब्यातील अंबरग्रीस यांचे वजन 1 किलो 130 ग्राम आसून याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 70 लाख आहे.पोलिसानी आधीक तपास केला असता यात दुसरा आरोपी ललित व्यास अटक केली असून हा गुजरातचा रहिवाशी आहे.

घाटकोपर पोलिसानी 2 आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. हे काही आंतरराष्ट्रीय व्यवहार आहे. का पोलीस अधिक तपास करीत आहेत.

।Conclusion:
Last Updated : Jun 18, 2019, 11:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.