ETV Bharat / state

Burglary Director At House : टीव्ही सिरियल दिग्दर्शकाच्या घरात लाखोंचा डल्ला, बांगुरनगर पोलिसांकडून तिघांना अटक - Police arrested three people

मास्क परिधान केलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी रविवारी दुपारी गोरेगाव पश्चिम येथील निर्माते-दिग्दर्शक संतोष रविशंकर गुप्ता (५१) यांच्या घरातून जवळपास ४० लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसांनी ४८ तासात तीघांना अटक केली आहे.

Burglary Director At House
Burglary Director At House
author img

By

Published : Jan 11, 2023, 10:53 PM IST

मुंबई : टीव्ही सिरीयलचे निर्माते-दिग्दर्शक संतोष रविशंकर गुप्ता (५१) यांच्या घरातून जवळपास ४० लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी ४८ तासात त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुस्तकीम उर्फ सोहेल शेख (२४), देवेश सव्हासिया (३१) आणि सर्वेश शर्मा (४५) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपीची नावे आहेत. विविध पथकांची नियुक्ती करत बांगूर नगर पोलिसांनी ही कारवाई केली.

चाळीस लाखांची चोरी - फिर्यादी संतोष रविशंकर गुप्ता यांच्या गोरेगाव पश्चिमेकडे असलेल्या धिरज रेमिटेनसी येथे राहते घर आहे. या घरी ८ जानेवारीला दुपारी १ ते १.३० वाजताच्या दरम्यान दोन अनोळखी इसमांनी जावुन त्यांचा विकास चौधरी नोकराचे हात दोरीने बांधून आणि त्याला पिस्तुलसारख्या वस्तुचा धाक दाखवून त्यांचे घरातील कपाट चावीने उघडुन त्यांची रोख रक्कम चाळीस लाख नऊ हजार, अदाजे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत संतोष गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून आयपीसी कलम ३९२, ४५४, ३८०, ५०६, ३४ अन्वये नोंद करण्यात आला होता.

दोन जण घुसले घरात - गुप्ता हे न्यू लिंक रोडवरील ओशिवरा बस डेपोजवळील धीरज रेसिडेन्सी येथे राहतात. त्याचा मदतनीस विकास चौधरी त्याचे जेवण बनवतो. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास गुप्ता घराबाहेर पडले होते. जयसिंग राठोड या कर्मचाऱ्यासोबत त्याच्या कार्यालयात काम करत असताना चौधरीने त्याला फोन केला तेव्हा दोन मास्क घातलेले अज्ञात घरात घुसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पिस्तुलचा धाक केली चोरी - या दोघांनी चौधरीला पकडून पिस्तुलचा धाक दाखवत त्याचे हात व तोंड बांधून त्यांना किचनमध्ये ढकलले. त्यानंतर त्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडून कपाटातील रोख रक्कम, मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी गुप्ताच्या तक्रारीवरून आयपीसीच्या कलम ३४ (सामान्य हेतू), ३९२ (दरोडा) आणि ४५४ (घरात घुसखोरी) शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुप्तांची राहती इमारत, जवळपासच्या परिसराचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.