ETV Bharat / state

Police Arrested Suraj Jadhav : ऑटो रिक्षात आरडीएक्स असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - हॉक्स कॉल

ऑटो रिक्षातून आरडीएक्स घेऊन जात असल्याचा हॉक्स कॉल करणाऱ्या हिस्ट्रीशीटर असलेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सुरज जाधव असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Police Arrested Suraj Jadhav
Police Arrested Suraj Jadhav
author img

By

Published : Feb 15, 2023, 5:54 PM IST

मुंबई : सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून बोरिवली परिसरात चोरीला गेलेल्या रिक्षातून दोघे आरडीएक्स घेऊन जात असल्याची खोटी माहिती हॉक्स कॉल करणाऱ्याने पोलिसांनी दिली होती. त्याचप्रमाणे बोरिवलीत बॉम्बस्फोट घडवून आणणार आहे अशी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या सूरज जाधव ( वय ३२ ) या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तात्काळ तपासाला सुरुवात : हॉक्स कॉल येताच प्रकरण गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी तपास केल्यानंतर फोन काॅल फसवा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या आरोपीचा शोध सुरु केला. सुरज जाधवची चौकशी केली असता, त्याने हा कॉल विनोद म्हणून केल्याचे सांगितले. मात्र, यापूर्वीही मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात चोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे सुरज जाधव विरोधात दाखल आहेत.

सहपोलीस आयुक्तांना देखील कॉल : दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलीस दलाच्या वाहतूक विभागात पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना रात्री 1 वाजून 11 मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या सेम मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक हेराफेरी करून अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. कॉल करून या व्यक्तीने प्रवीण पडवळ यांना मीरा-भाईंदर परिसरात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. अज्ञात व्यक्ती हिंदी भाषिक असल्याचे त्याच्या बोलण्यावरून कळत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी सर्व माहिती प्रवीण पडवळ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीचा शोध मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुगल कार्यालय उडवून देण्याची धमकी : मुंबईतील बीकेसी येथील गुगल (Google) ऑफिसमध्ये पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ, असा धमकीचा निनावी कॉल करण्यात आला होता. या खोट्या कॉलनंतर बॉम्ब शोधक पथकाकडून रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर बीकेसी पोलिसांनी तपासाची चक्री फिरवून हैदराबादहून एका इसमाला अटक केली. पोलिसांनी केलेल्या बिल्डिंग तपासणी दरम्यान कुठली ही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. पोलीस अधिकारी, बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली होती. ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्रथामिक माहिती समोर आली होती.

शाळेत टाइम बॉम्ब : शाळेत टाइम बॉम्ब असल्याचा दावा करणारा दूरध्वनी काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत आला होता. दूरध्वनी करणाऱ्याने लगेचच फोन कट केला होता. शाळा व्यवस्थापनाने तातडीने यासंदर्भात बीकेसी पोलिसांना कळवले होते. बॉम्बशोधक पथकाने शाळेचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, कोठेही बॉम्बसदृश काही आढळले नव्हते. दरम्यान, प्रसिद्धी मिळविण्यासाठी हा धमकीचा दूरध्वनी करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.

हेही वाचा - Cheteshwar Pujara Meet PM Modi : चेतेश्वर पुजारा 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज; मोदींनी केले अभिनंदन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.