ETV Bharat / state

सीएसएमटी पूल दुर्घटना : पालिकेचा सहाय्यक अभियंता काकुळते जेरबंद

आज आरोपी काकुळतेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सीएसएमटी पूल दुर्घटना
author img

By

Published : Apr 2, 2019, 4:53 AM IST

Updated : Apr 2, 2019, 11:53 AM IST

मुंबई - सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी मुंबई महापालिकेचे सहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळते याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मंगळवारी आरोपी काकुळतेला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महापालिकेने या दुर्घटनेची तपासणी करुन अहवाल सादर केला. यात पुलाचे ऑडिट करणाऱ्या डी. डी. देसाई असोसिएटेड इंजिनियरिंग कन्सल्टन्टसह अन्य कंपनींवर ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी निरज देसाईला ताब्यात घेतले होते.

सीएसएमटी पूल १४ मार्चला पडला होता. या घटनेत ६ जणांचा मृत्यू तर ३१ जण जखमी झाले होते. पोलीस चौकशीत या गुन्ह्यात ३०४/२ कलम नव्याने जोडण्यात आले असून या प्रकरणी, ह्या पुलाचे ऑडिट करणाऱ्या नीरज कुमार देसाई या स्टक्चरल ऑडीटरला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आझाद मैदान पोलिसांनी या प्रकरणी मुंबई महापालिकेचा सहाय्यक अभियंता कळकुलते यास अटक केली आहे. पुलाच्या मिळालेल्या ऑडिट रिपोर्टचे निरीक्षण करण्याची जवाबदारी सहाय्यक अभियंता कळकुलतेवर होती. यात निष्काळजीपणा केल्याचे पोलीस तापासत उघड झाल्याने सोमवारी रात्री उशिरा त्यास अटक करण्यात आली आहे.

एक्स्पर्ट असूनदेखील ऑडिट करणाऱ्यांनी निष्कळजीपणा दाखवला म्हणून या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ऑडिट करणाऱ्या व्यक्तीने जाणूनबुजून निष्काळजीपणा दाखवला म्हणून ही दुर्घटना घडल्याचे पोलीस तापासात समोर आले आहे. अटक आरोपी नीरज देसाई हा एमई मधून शिक्षित असून एक्सपर्ट आहे. त्यानेच या पुलाचे ऑडिट केले होते. त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या दोषी सहाय्यक अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी जखमी लोकांच्या आणि मृतांच्या नातेवाईकांचे जबाब घेतले आहेत. या प्रकरणी मुंबई महापालिकेचे अधिकारी संजय दराडे यांचीदेखील चौकशी झाली आहे. पालिकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचे ऑडिट, दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान हिमालय पूल दुर्घटनेनंतर ऑडिट, दुरुस्ती, तपासणी ही कामे आता वेगाने होतील, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Intro:Body:

मुंबई - सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी मुंबई महापालिकेचे सहायक अभियंता एस.एफ. काकुळते याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी उद्या आरोपी काकुळतेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हिमालय या पादचारी पुलाचा काही भाग १४ मार्चला कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा नाहक बळी गेला. याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पालिकेने या दुर्घटनेची तपासणी करून अहवाल सादर केला. यात पुलाचे ऑडिट करणाऱ्या डी. डी. देसाई असोसिएटेड इंजिनियरिंग कन्सल्टन्ट यासह अन्य कंपनींवर ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी निरज देसाईला ताब्यात घेतले होते. त्यानंतर याप्रकरणातील ही दुसरी अठक आहे.  

या दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचे ऑडिट, दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हिमालय पूल दुर्घटनेनंतर ऑडिट, दुरुस्ती, तपासणी ही कामे आता वेगाने होतील, असे पालिकेने सांगितले गेले.

Conclusion:
Last Updated : Apr 2, 2019, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.