ETV Bharat / state

जितेंद्र आव्हाड छुप्या रस्त्याने 'आरे'त; पोलिसांनी घेतले ताब्यात - मुंबई मेट्रो

'आरे'मधील वृक्षतोडीला विरोध दर्शवण्यासाठी आपण आरेमध्ये जाणार असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते. चारच्या सुमारास पवई येथील छुप्या रस्त्याने आव्हाड वृक्षतोडीच्या जागी पोहोचले. यानंतर तातडीची कारवाई करत आव्हाड यांना आरे पोलिसांनी ताब्यात घेतले.

आमदार जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Oct 5, 2019, 10:43 PM IST

मुंबई - उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर रात्रीच मेट्रो प्रशासनाने आरे'मधील झाडे तोडायला सुरुवात केली. याला राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. दरम्यान या भागात कलम 144 लागू केला गेला आहे. 'आरे'मधील वृक्षतोडीला विरोध दर्शवण्यासाठी आपण आरेमध्ये जाणार असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते. चारच्या सुमारास पवई येथील छुप्या रस्त्याने आव्हाड वृक्षतोडीच्या जागी पोहोचले. तसेच त्यांनी व्हिडिओद्वारे या घटनेचा निषेधही नोंदवला.

आमदार जितेंद्र आव्हाड

हेही वाचा - सगळा अट्टहास 'आरे'मध्येच का? जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

यानंतर तातडीची कारवाई करत आव्हाड यांना आरे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. यावेळी आव्हाड यांनी "मुंबईला प्राणवायू देणाऱ्या झाडांची हे सरकार कत्तल करत आहे. फक्त 20 दिवसांनी निवडणुका आहेत. तेव्हा हीच झाडे तुम्हाला गळफास लावतील. या सरकारने विकासाच्या नावाने वाटोळे केले आहे. हिटलरच्या बापानेही असे केले नसेल", अशी संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.

Intro:मुंबई । मुंबई उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर रात्रीच्या रात्री मेट्रो प्रशासनाने झाडे तोडायला सुरुवात केली. याला राजकीय पक्ष असतील सामाजिक कार्यकर्ते यांनी विरोध केला. या विभागात 144 कलम लागू केला गेला आहे. मी आरे मध्ये पोहाचणारच असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते. चारच्या सुमारास पवई येथील छुप्या रस्त्याने आव्हाड वृक्षतोडीच्या जागी पोहोचले आणि त्यांनी व्हिडिओद्वारे या घटनेचा निषेध केला. यानंतर तातडीची कारवाई करत आव्हाड यांना आरे पोलिसानी ताब्यात घेतले.त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
Body:झाडे कापण्यात आली आहेत.मुंबईला प्राणवायू देणाऱ्या झाडाची हे सरकार कत्तल आहे. फक्त 20 दिवसानी निवडणुका आहेत. तेव्हा हीच झाडे तुम्हाला गळफास लावतील. या सरकारने विकासाच्या नावाने वाटोळे केले आहस. हिटलरच्या बापाने असे केले नसेल ते सरकार करत आहे असे आव्हाड यांनी सांगितलेConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.