मुंबई - शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू पुन्हा एखदा आक्रमक झाले आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडूंनी राजभवनावर मोर्चा काढला आहे. या राजभवनाकडे जाणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी अडवले असून पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्यासह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. हा मोर्चा काढण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी बच्चू कडूंना नोटीस पाठवली होती.
हेही वाचा - घाटकोपरचे माणिकलाल मैदान वाचवण्यासाठी खेळाडू मैदानात
परतीच्या पावसाने राज्यभरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे राज्याच्या सत्तासंघर्षाचा तिढा सुरु आहे. हा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने आमदार बच्चू कडू यांनी हे आंदोलन छेडले होते.
हेही वाचा - महाराष्ट्र ही काय जुगारावर लावण्याची 'चीज' नाही; सेनेचा भाजपवर बाण
राजभवनावर मोर्चा काढण्यात येत असल्याने या परिसराला पोलीस छावणीचे रुप आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.