ETV Bharat / state

Mumbai Crime : 'तो' गेली 15 वर्षे होता पसार, नावही बदलले; पण सोन्याच्या दातांवरून पोलिसांनी त्याला पकडले - व्यावसायिकाला गंडा घालून पसार

दादर येथील हिंदमाता परिसरातील एका व्यावसायिकाला गंडा घालून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी त्याच्या सोन्याच्या दोन दातांवरून ओळख पटवून अटक केली. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी प्रवीण आशुभा जडेजा उर्फ प्रवीणसिंह उर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा (३८) याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने स्वतःची ओळख लपविण्यासाठी प्रवीण ऐवजी प्रदीपसिंह असे नाव बदलले होते. १५ वर्षे तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

Mumbai Crime
सोन्याच्या दातांवरून आरोपीस अटक
author img

By

Published : Feb 10, 2023, 8:38 PM IST

मुंबई: न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करून आरोपीला फरार घोषित केले : दादर येथील हिंदमाता परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय करणारे तक्रारदार ए. एच. गंगर (४०) यांच्याकडे आरोपी जडेजा हा १५ वर्षांपूर्वी कामाला होता. अन्य व्यापाऱ्यांकडे उधार असलेली रक्कम गंगर यांनी प्रवीणला आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी मिळालेल्या ४० हजार रुपयांवर त्याने डल्ला मारला. तो लघुशंकेला गेले असताना कोणीतरी रक्कम असलेली पिशवी चोरल्याचा बनाव रचला. याप्रकरणी रफी किडवाई मार्ग पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम ४०८ अंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. मात्र, या गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात हजर राहत नव्हता. त्यामुळे दादर येथील न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला फरार घोषित केले होते.

दातांच्या हिंटवरून तपास केला सुरू: गेल्या १५ वर्षांपासून जडेजा फरार होता. या गुन्ह्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस हवालदार नारायण कदम, सुरेश कडलग, रवींद्र साबळे, महिला पोलीस शिपाई विद्या यादव आणि पोलीस शिपाई सुशांत बनकर यांनी तपासाची चक्रे जोरदार फिरवली. त्यानंतर पोलिसांना जडेजाबाबत काही माहिती मिळाली. ती माहिती अशी की, आरोपीचे पुढील वरचे दोन दात सोन्याचे आहेत. याच्या दातांच्या हिंटची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्याअनुषंगाने तपास सुरू केला. आरोपीच्या जडेजा या आडनावावरून तो गुजरात राज्यातील कच्छ येथील रहिवासी असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी दाताच्या माहितीच्या आधारे जोरात सर्च ऑपरेशन सुरू केले.

खबऱ्याकडून माहिती मिळाली: शेवटी पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून सोन्याचे दात, वय आणि नोकरीधंदा या बाबत मिळताजुळती व्यक्ती तेथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांच्या पथकाने कट रचला आणि आरोपीची संपर्क साधून विम्याचे पैसे घेण्यासाठी मुंबईत बोलावून घेतले. पैशांसाठी मुंबईत येताच पथकाने आरोपीला घेरले आणि ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी प्रवीण जडेजा हाच आरोपी असल्याची शहनिशा करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आणखी कुणाला अशा प्रकारे गंडा घातला आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

हेही वाचा: Aishwarya Rai Bachchan Tax Issue: तहसीलदारांच्या नोटीसनंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने अखेर भरला कर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.