मुंबई - समतानगर पोलीस स्थानकामध्ये एक अजब गुन्हा समोर आला आहे. 31 वर्षीय महिला शिक्षकेला आपण घटस्फोटीत असल्याचे सांगून तिच्यासोबत लग्न करणे व अप्राकृतिक संबंध ठेवणे यासोबतच मानसिक त्रास देणे व दागिने चोरणे या गुन्ह्यांतर्गत एका आरोपीला समतानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव आदित्य मेहता असून त्याचे मध्य प्रदेशातील उज्जैन येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी नागपूर येथील नेल्सन स्क्वेअर छिंदवाडा रस्ता येथील राहणारा आहे. आरोपीची आई कुसुम व त्यांची तिसरी पत्नी अनिता मारोलीच्या विरुद्धसुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आरोपी आदित्य मेहता आणि शिक्षिका यांनी 2020 मध्ये कांदिवली पूर्व येथील गोल्ड जिममध्ये पहिल्यांदा भेटली. त्यात त्याने आपला घटस्फोट झाल्याचे सांगितले, यानंतर त्यांच्यामध्ये जवळीक वाढली आणि गेल्या वर्षी टाळेबंदीमध्ये त्यांनी घरातच लग्न केले. पीडितेचे असे काही म्हणणे आहे की, लग्नानंतर आधी त्याने तिला नागपूरला आपल्या घरी नेले. तिथे त्या महिलेसोबत जबरदस्ती करण्यात आली, जबरदस्ती संबंध ठेवण्यात आले व कधीकधी तिच्यासोबत मारहाणसुद्धा करण्यात आली. यासोबतच का महिलेकडून घरासाठी लाखो रुपये काढण्यात आले. या दरम्यान मेहताने पीडितेकडून जवळपास सहा लाख किमतीचे दागिने घेतले.
वकिलांचे म्हणणे आहे की, आदित्य मेहताचा उद्देश फक्त महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करून शारीरिक संबंध ठेवणे व पैसे उकळणे आहे. आतापर्यंत आदित्यने पाच महिलांची लग्न करून त्यांच्याकडून अशाप्रकारे पैसे घेतले आहेत. पोलिसांनी सांगितले की, महिलांनी तक्रार ऑगस्ट 2020 मध्ये केली. त्यानंतर कलम 498 497 376 377 या अंतर्गत तक्रार दाखल केले आहे. सध्या आरोपीला आठ दिवसापर्यंत पोलीस कोठडीत ठेवले गेले आहे.