ETV Bharat / state

विकानाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई; एका दिवसात 4867 वाहने जप्त

मुंबईतील नागरिकांना आता २ किमी आवारातच तेही महत्वाचे काम असल्यासच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. विनाकारण दुचाकी किंवा चारचाकी वाहन रस्त्यावर आणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

police-action-on-4867-vehicles-in-one-day-in-mumbai
विकानाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई
author img

By

Published : Jun 29, 2020, 12:30 PM IST

मुंबई- कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविणासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे समोर आले. 30 जूनपर्यंत असणारे लाॅकडाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या संदर्भात नव्या नियमानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील नागरिकांना आता २ किमी आवारातच तेही महत्वाचे काम असल्यासच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. विनाकारण दुचाकी किंवा चारचाकी वाहन रस्त्यावर आणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

विकानाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई...

एकाच दिवसात ४ हजार ८६४ वाहने जप्त
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर अचानक उत्तर मुंबई परिसरात कोरोना रुग्णाच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. २८ जून रोजी उत्तर मुंबईत २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. याठिकाणी १ हजार ३०६ वाहन जप्त केली आहेत. तसेच कुलाबा परिसरात १५४, गिरगाव ३७७, नागपाडा १०८, धारावी ३००, दादर माटुंगा परिसरात २९०, चेंबूर २१०, घाटकोपर ३३४, वाकोला २१२ तर सांताक्रुज परिसरात २५७ वाहन जप्त केली आहेत. मुंबई शहर व उपनगरात एकूण ४ हजार ८६४ वाहने जप्त केली आहेत.

मुंबई शहरात लॉकडाऊन लागू झाल्यापासून मुंबई पोलिसांकडून ११ हजार ४७ प्रकरणात कलम १८८ नुसार तब्बल २१ हजार ६९९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात २ हजार ९१९ जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर ५ हजार ९८३ आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. १२ हजार ७९७ आरोपींना जामिनावर सोडण्यात आले आहे.

रस्त्यावर फिरताना मास्क न वापरणाऱ्या ३ हजार ३१६ व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. लॉकडाऊन काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, अवैध्य वाहतूक, विना परवाना हॉटेल, पानटपरी चालविणे यासंदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत. सर्वाधिक गुन्हे उत्तर मुंबईत ३ हजार ८४३ दाखल करण्यात आले आहेत. पश्चिम मुंबईत २ हजरा १११, पूर्व मुंबईत १ हजार ८४६ , मध्य मुंबईत २२०२ तर दक्षिण मुंबईत १०४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.