मुंबई Poet and Artist Imroz Passes Away : सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी इमरोज यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय. वयाच्या 97 व्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं सुप्रसिद्ध कवी आणि लेखिका अमृता प्रीतम यांच्या प्रेम कहाणीतला 'प्रीतम' हरपलाय. इमरोज अमृता प्रीतम यांच्याबरोबर असलेल्या नात्यानंतर खूप लोकप्रिय झाले होते. दोघांनी आजपर्यंत लग्न केलं नाही पण जवळपास 40 वर्ष ते एकमेकांबरोबर राहिले.
वृद्धापकाळानं निधन : सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी इमरोज उर्फ इंद्रजीत सिंह यांचं आज मुंबईतील कांदिवली इथं त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कृत्रिम अन्ननलिकेद्वारे अन्न दिलं जात होतं. मात्र, अखेरपर्यंत त्यांनी आपली सहचारिणी आणि सोबती अमृता प्रीतम यांच्या नावाचा जप केला. 1926 मध्ये लाहोर पासून काही अंतरावर असलेल्या एका गावात इंद्रजीत सिंह यांचा जन्म झाला होता. मात्र ते इमरोज या नावानं ओळखले जात होते. इमरोज हे उत्तम चित्रकारही होते. इमरोज यांनी जगजीत सिंग यांच्या ‘बिरदा दा सुल्तान’ आणि बीबी नूरन यांच्या कुली रह विच सारख्या अनेक प्रसिद्ध एलपीचे कव्हर डिझाइन केले होते.
अमृता प्रीतम मुळं चर्चेत : इंद्रजीत सिंह सुप्रसिद्ध चित्रकार असले तरी ते इमरोज म्हणून अमृता प्रीतम या सुप्रसिद्ध कवी आणि लेखिकेमुळं चर्चेत आले. अमृता प्रीतम यांना आपल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ तयार करायचं होतं. त्यावेळी त्यांची आणि इमरोज यांची भेट झाली. त्यानंतर दोघं सुमारे 40 वर्ष एकत्र राहिले. मात्र, त्यांनी लग्न केलं नाही. अमृता प्रीतम या इमरोज पेक्षा सात वर्षांनी लहान होत्या. अमृता प्रीतम यांनी पंजाबी आणि हिंदीमध्ये कविता तसंच अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची 100 हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही प्रसिद्ध कलाकृतींमध्ये फाइव्ह इयर्स लाँग रोड, उंचास दिन, पिंजर, अदालत, कोरे कागज, सागर और सिपियां यांचा समावेश होतो. 2005 मध्ये अमृता प्रीतम यांचं निधन झालं. तेव्हा मृत्यूपूर्वी त्यांनी मै तुझे फिर मिलूंगी अशी कविता लिहिली होती. त्यानंतर इमरोज यांनी त्यांची ही कविता पूर्ण केली आणि तू माझ्या सोबतच आहे असा त्याचा शेवट केला. मरेपर्यंत इमरोज अमृता प्रीतम यांच्या प्रेमात होते. त्यामुळं इमरोज यांच्या जाण्यानं एका प्रेम कहाणीचा शेवट झाल्याचं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
हेही वाचा :