ETV Bharat / state

Praveen Raut Case Update : प्रवीण राऊत यांनी राजकीय नेत्यांना पैसे दिले, ईडीने न्यायालयासमोर दिलेल्या माहितीनंतर 14 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत वाढ - उद्योजक प्रवीण राऊत पीएमएलए न्यायालय कोठडी

प्रवीण राऊत हे ( Sanjay Raut associate Praveen Raut ) संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. एचडीआयएल रिअल इस्टेट या कंपनीद्वारे पत्राचाळ जमीन घोटाळ्यात एक हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत यांचा पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे.

Praveen Raut
प्रवीण राऊत
author img

By

Published : Feb 9, 2022, 10:01 PM IST

Updated : Feb 18, 2022, 3:06 PM IST

मुंबई - मनी लॉड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार प्रकरणात अटक केली. ( Praveen Raut Money Laundering Case ) त्यावर बुधवारी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान ईडीने न्यायालयासमोर सांगितले की प्रवीण राऊत यांनी अनेक राजकीय नेत्यांना पैसे दिले आहे, अशी बाब तपासातून समोर आली आहे. त्यामुळे आणखी कोठडीची आवश्यकता आहे. त्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने राऊत यांच्या कोठडीत 14 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे. ( PMLA Court Extend Praveen Raut Custody )

तपासात सहकार्य न केल्यामुळे अटक -

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. एचडीआयएल रिअल इस्टेट या कंपनीद्वारे पत्राचाळ जमीन घोटाळ्यात एक हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत यांचा पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे मारल्यानंतर राऊत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात नेऊन चौकशी सुरू केली होती. मात्र, अनेक तासांच्या चौकशीनंतरही तपासात सहकार्य न केल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांना अटक केली.

हेही वाचा - Anil Deshmukh Vs Sachin Waze : अनिल देशमुखांचे नाव घेणार नाही, मला अन् माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका सचिन वाझेचा गौप्यस्फोट

डीएचआयएल या कंपनीची उप-कंपनी असलेल्या गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीला म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने एफएसआय घोटाळ्यात मदत केल्याप्रकरणाचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. काही वर्षांपूर्वी गोरेगावच्या सिद्धार्थ नगरातील पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे काम गुरू आशिष कंस्ट्रक्शनतर्फे करण्यात येणार होते. मात्र, सदनिका न बांधताच फसवणूक करून एफएसआय विकण्यात आल्याचे समोर आले होते.

बुधवारी त्यांची कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा, अधिकच्या चौकशीसाठी ईडीकडून त्यांची कोठडी मागण्यात आली. प्रविण यांना अनेक राजकीय व्यक्तींनी पैसे दिल्याचा आरोपही यावेळी ईडीच्यावतीने करण्यात आला. त्याची दखल घेत न्यायालयाने राऊत यांना 14 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

Last Updated : Feb 18, 2022, 3:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.