ETV Bharat / state

पी एम सी बँक घोटाळा : आरोपी मेहुल ठाकूरचा विदेशात जाण्यासाठीचा अर्ज, कोर्टाने निर्णय ठेवला राखून - PMC Bank Scam Accused Mehul Thakur

पी एम सी बँक घोटाळा मधील आरोपी मेहुल ठाकूरचा विदेशात जाण्यासाठीचा अर्ज सत्र न्यायालयात दाखल केला आहे. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. राकेश कुमार वाधवान, राणा कपूर इतर मनी लँडिंग प्रकरणातील आरोपी मेहुल ठाकूरचा परदेशात जाण्यासाठीच्या अर्जावर सुनावणी झाली. सत्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.

पी एम सी बँक घोटाळा
पी एम सी बँक घोटाळा
author img

By

Published : May 30, 2023, 4:11 PM IST

मुंबई - बहुचर्चित पी एम सी बँक आणि येस बँक घोटाळा प्रकरणातील आरोप असलेला राकेश कुमार वाधवान व त्याचा मुलगा सारंग वाधवान आणि राणा कपूर तसेच इतर आरोपींपैकी मेहुल दीपक ठाकूर यांच्यावर प्रचंड मोठ्या रकमेचे आर्थिक बेकायदेशीर गैरव्यवहार केल्याप्रकरणी खटले दाखल आहेत. यापैकी राणा कपूर अटकेत आहे. मात्र मेहुल ठाकूर जामीनावर बाहेर आहे. मेहुल ठाकूर याचा विदेशात जाण्यासाठीचा अनुमती अर्ज सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला. तसेच सुनावणी देखील झाली. मात्र न्यायालयाने अर्ज दाखल करून घेतल्यानंतर दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून सुनावणी तहकूब केली . तसेच 31 मे रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

पीएमसी बँक घोटाळा - सक्तवसुली संचलनालयाने येस बँकेचा संस्थापक राणा कपूर तसेच पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी राकेश कुमार वाधवान व त्याचा मुलगा सारंग वाधवान आणि इतर 13 आरोपींवर कारवाई केलेली आहे. काही आरोपी जामिनावर आहेत. त्यांच्या संदर्भात सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. या आरोपींपैकी एक आरोपी मेहुल ठाकूर याचा सत्र न्यायालयामध्ये विदेशात जाण्यासाठी अनुमती अर्ज नुकताच दाखल करण्यात आला. मात्र न्यायालयाने ताबडतोब निर्णय घेतला नाही.

विदेशात जाण्यासाठी परवानगी - मेहुल ठाकूर हा एक आरोपी आहे. परंतु त्याला कामानिमित्ताने विदेशात जाण्यासाठी परवानगी हवी आहे. म्हणूनच त्याच्या वतीने वकील विवेक बाबर यांनी मेहुल ठाकूर याला विदेशात प्रवास करण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज दाखल केला. तर या संदर्भात सक्तवसुली संचालनाच्या वतीने वकील सुनील गोंजालवीस यांनी न्यायालयासमोर ईडीची बाजू मांडली.

उद्या निर्णयाची शक्यता - पी एम एल ए न्यायालयाने दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्या. तसेच आरोपी मेहुल ठाकूर याचा परदेशात प्रवास करण्याबाबतचा अनुमती अर्ज देखील दाखल करून घेतला. मात्र त्यावर निर्णय अद्याप केलेला नाही. सुनावणी तहकूब केली व या संदर्भातील पुढील सुनावणी 31 मे 2023 रोजी निश्चित केलेली आहे.

काय आहे पी एम सी घोटाळा - पीएमसी बँक तसेच एचडीआयएल डीएचएफएल असे स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड अशा विविध प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणे मेहुल ठाकूर याच्यावर अनेक गुन्हे आहेत. पीएमसी बँकेच्या घोटाळा प्रकरणी रिअल्टी फार्म हाऊस डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड याचा मुख्य प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग वाधवान त्याच्यासह मेहुल ठाकूर देखील आरोपी आहे. पीएमसी बँकेचा सुमारे 6500 कोटी रुपयांचा हा घोटाळा त्यांनी केल्याचा आरोप आहे. मेहुल ठाकूर सध्या जामिनावर बाहेर आहे. उद्या त्या संदर्भात परदेश प्रवासावर न्यायालय काय निर्णय देते ते होईल स्पष्ट.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.