ETV Bharat / state

PM Modi Mumbai Metro : मेट्रो दोन ए आणि सातमुळे दहिसरपासून थेट मध्य किंवा हार्बर लाईनला वेगाने जाता येणार, वाचा सविस्तर

मेट्रो रेल्वे मार्गिका दोन ए आणि सात यांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे आता दहिसरपासून थेट मध्य किंवा हार्बर रेल्वे मार्गाला वेगाने जाता येणार आहे. त्याशिवाय दहिसरपासून अंधेरी ते घाटकोपर मार्गे थेट ठाणे, कल्याण, कर्जतला आता वेगात जाता येईल.

author img

By

Published : Jan 19, 2023, 10:20 AM IST

PM Modi Mumbai Metro
मेट्रो दोन ए आणि सातचे उद्घाटन
मेट्रो दोन ए आणि सातचे उद्घाटन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो दोन ए आणि सातचे बटन दाबून उद्घाटन केले जाणार आहे. उद्घाटन सोहळा एमएमआरडीच्या वांद्रे कुर्ला संकुलाच्या मैदानावर केले जाणार आहे. ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्घाटन होत आहे. त्यामधील सर्वच रेल्वे स्थानक काही सुरू झालेले नाहीत. परंतु यामध्ये जे रेल्वे स्थानक आहेत. त्यांची नावे म्हणजे वालनी, मालाड, गोरेगाव, पहाडी गोरेगाव, लोअर ओशिवरा, ओशिवरा आणि अंधेरी ही आहेत.

मेट्रो मार्गिका 2अ चा फायदा : नवीन मेट्रो रेल्वे मार्गिका दोन ही अंधेरी मेट्रो रेल्वे स्थानक पश्चिम दिशेस एक या ठिकाणी कनेक्ट होते. त्यामुळे दहिसरवरून या मार्गीकेने अंधेरीला पटकन येता येते. अंधेरीहून घाटकोपरला जाण्यास त्वरित मेट्रो उपलब्ध होते. अंधेरीवरून दादरला किंवा चर्चगेटला देखील वेगाने जाता येऊ शकते. या मेट्रो मार्गीकेचा सर्वसामान्य जनतेला लाभ होणार आहे. मात्र दहिसर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारे कामगार जे अंधेरीला कामास येतात त्यांना देखील सोयीचे आहे, असे येथील नागरिकांनी सांगितले.

मेट्रो मार्गीका सात : दहिसर ते बुंदेवाली मेट्रो रेल्वे स्थानकापर्यंत एकूण 14 मेट्रो रेल्वे स्थानके आहेत. मेट्रो दोन ए आणि मेट्रो मार्गीका सात यांची एकूण लांबी 35 किलोमीटर आहे. दहिसर ते ओवरी पाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान देवीपाडा ते मागाठाणे पासून, पोईसर तसेच अकुर्ली म्हणजे जिथे महिंद्रा कारखाना आहे. तसेच पुढे कुरार व्हिलेज ते दिंडोशी आणि आरे ते गोरेगाव पूर्व आणि जोगेश्वरी पूर्व ते मोगरा. मोगरा हे मेट्रो रेल्वे स्थानक जोगेश्वरी लोकल रेल्वे स्थानकापासून पूर्वेला साधारण तीन किलोमीटर अंतरावर आहे.

मेट्रो मार्गीका सातचा फायदा : अंधेरी जोगेश्वरी पूर्व या परिसरामध्ये लाखो जनता राहते. हा भाग औद्योगिक पट्टा असल्यामुळे या भागामध्ये अनेक प्रकारचे कारखाने आहेत. सेवा उद्योग आहेत, विविध कॉर्पोरेट कार्यालय देखील यामध्ये आहेत. त्यामुळे कामगार वर्ग, व्हाईट कॉलर जॉब करणारे, विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय करणारे अशा सगळ्यांना जर दहिसरला जायचे असेल तर लोकल रेल्वे पकडून घाई ऐवजी शांतपणे निवांतपणे त्यांना या मेट्रो सात मार्गीकेचा फायदा होणार आहे.

ट्रेनवर जाणारा भार थोडा कमी होण्याची शक्यता : मेट्रो मार्गीका 7 मुळे लोकल ट्रेनवर जाणारा भार थोडा कमी होण्याची शक्यता आहे. तसेच या दोन्ही मार्गीकामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल. जेणेकरून प्रदूषण कमी होईल. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या देखील आटोक्यात येऊ शकते. 35 किलोमीटर संपूर्ण रस्ता असणाऱ्या मेट्रो रेल्वे स्थानक क्रमांक दोन आणि सात यांच्यासाठी सहा डबे असलेल्या 22 मेट्रो रेल्वे आहेत. तर एकूण दोन्ही मेट्रो रेल्वे मार्गावर धावण्यासाठी 132 कोच या संदर्भात उपलब्ध आहेत. 132 कोच यासाठी ही गरज पडल्यास जादा डबे या मेट्रो रेल्वेसाठी जोडता येऊ शकतील. संपूर्ण पहिल्या रेल्वे स्थानक ते अंतिम रेल्वे स्थानक अशी सुरुवात व्हायची आहे. त्याचे कारण एप्रिल 2022 मध्ये दोन्ही मार्गिकेचे निवडक रेल्वे स्थानकांच्या कामाचे उद्घाटन झालेले आहेत आता दोन्ही मार्गीकेचे राहिलेल्या रेल्वे स्थानकांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.

हेही वाचा : Mumbai Metro Rail : पश्चिम उपनगरातील प्रवाशांना दिलासा ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मेट्रोच्या नव्या मार्गिकांचे लोकार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.