ETV Bharat / state

काँग्रेसला फक्त ५० जागा मिळतील; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

मी शिवाजी महाराजांचा मावळा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Apr 26, 2019, 9:42 PM IST

Updated : Apr 26, 2019, 10:42 PM IST

मुंबई - विरोधी पक्षाला जास्तीत जास्त ५० जागा मिळतील, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे. यावेळी मोदींनी विरोधकांवर जबरदस्त टीका केली आहे. विकल्पाची नाही, तर ही संकल्पाची निवडणूक आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे माझा छोटा भाऊ असल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. महात्मा गांधींनी काँग्रेस विसर्जित करायला सांगितली असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईतील भाषण

आपली संस्कृती ही आपली ताकद आहे. ही निवडणूक देशाला नवी दिशा देणारी निवडणूक आहे. ही निवडणूक गरिबी हटाव साठी नाही, तर गरिबांना सक्षम करण्यासाठी आहे. देशात अजूनही लाट आहे, यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. देशातला नवा मतदारही आमच्या सोबत आहे. नवीन मतदाराला नवा भारत पाहिजे तो आम्ही देणार आहोत, हे नव्या मतदारालाही माहीत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

भूतकाळात रमणारे नेते नव्या पिढीला काही देऊ शकत नाहीत. तसेच भाजप २०१९ मध्येही स्वबळावर सत्तेवर येईल. वाटल्यास काही जुने टीव्हीवरील रीपोर्टस बघण्याचे आवाहन मोदींनी यावेळी केले. तसेच एनडीएला या निवडणुकीत ३५० ते ४०० जागा मिळतील असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. तुमचा हा चौकीदार चांगले काम करू शकला, यापुढे ही भारताला जागतिक पटलावर मोठे करण्यासाठी काम करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील महत्तवाचे मुद्दे -

  • मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे.
  • विकल्पाची नाही ही संकल्पाची निवडणूक आहे.
  • काँग्रेस ४४ आकडा पार करणार की, ४० जागा मिळवणार ही चर्चा आहे.
  • २०१४ मध्ये काँग्रेसने सर्वात कमी जागा जिंकल्या आणि २०१९ मध्ये काँग्रेसने सर्वात कमी जागा लढवल्या.
  • उद्धव ठाकरे छोटा भाऊ असल्याचा उल्लेख केला.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून भाषणाला केली सुरुवात
  • संस्कृतीच्या नगरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि समृद्ध असलेल्या मुंबईत आशीर्वाद घेण्यासाठी आलो.
  • आई मुंबादेवी आणि सिद्धीविनायक चरणी माझा कोटी कोटी प्रणाम, बाळासाहेब ठाकरे यांना ही केले अभिवादन
  • मी आज काशीत माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे.
  • विरोधकांमध्ये आठ जागा लढवणारे पक्षाचे नेतेही पंतप्रधान बनण्याची स्वप्न पाहत आहेत.
  • निवडणूक असताना काँग्रेसने आयपीएल सामने खेळू दिले नाहीत.
  • आता देशात निवडणूकही सुरू आहे आणि आयपीएलदेखील सूरू आहेत.
  • आता दहशतवाद्यांची काही खैर नाही. घुसके मारेंगे
  • देशासाठी बलिदान देणाऱया पोलिसांचे आम्ही स्मारक बांधले.

Last Updated : Apr 26, 2019, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.