ETV Bharat / state

मुंबई महापौर कार्यालय अन् बंगल्यातून प्लास्टिक बॉटल्स हद्दपार, काचेच्या बाटल्या वापरण्याचे निर्देश - मुंबई महापौर किशोरी पेडणेकर

प्लास्टिक बॉटल्सवर बंदी नसल्याने त्याचा सर्रास वापर होतो. या बाटल्या रिकाम्या झाल्यानंतर टाकून दिल्या जात असल्याने त्याचा कचरा जमा होतो. यामुळे पालिकेत होणाऱ्या समित्यांच्या बैठकांमध्ये नगरसेवक आणि सदस्यांना काचेच्या ग्लासात पाणी देण्यात यावे, असे परिपत्रक प्रशासनाने काढले होते. त्यानंतरही पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा वापर केला जातो. प्लास्टिक बंदी १०० टक्के लागू व्हावी म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुढाकार घेतला आहे.

plastic bottles decision mayor pednekar
मुंबई महापौर कार्यालय अन् बंगल्यातून प्लास्टिक बॉटल्स हद्दपार
author img

By

Published : Jan 23, 2020, 7:29 PM IST

मुंबई - राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी मुंबईतही केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या कार्यालयात आणि महापौर बंगल्यावर प्लास्टिक बाटल्यांवर बंदी घालून त्याऐवजी काचेच्या बाटल्या वापरण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. प्लास्टिक बंदीच्या अंलबजावणीसाठी मी माझे कार्यालय आणि बंगल्यापासून सुरुवात केली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी इतरांनीही त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

मुंबई महापौर कार्यालय अन् बंगल्यातून प्लास्टिक बॉटल्स हद्दपार, काचेच्या बाटल्या वापरण्याचे निर्देश

शिवसेनेचे युवा नेते व सध्याचे महाराष्‍ट्र राज्‍याचे पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या संकल्‍पनेतून राज्यात २३ जून २०१८ ला प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. त्यानुसार मुंबई महापालिकेने शहरात जोरदार कारवाई सुरू केली आहे. यामध्ये प्लास्टिक व थर्माकोल वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणुकीवर बंदी घालण्यात आली. मार्केट, आस्थापना आणि परवाना विभागातील ३१० अधिकाऱ्यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले. या विशेष पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत ६८ ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रेही सुरू करण्यात आली. मात्र, अजूनही व्यावसायिक, दुकानदार तसेच फेरीवाल्यांकडून प्लास्टिकचा वापर सर्रास सुरू आहे. कारवाई सुरू असतानाही १०० टक्के प्लास्टिक बंदी झालेली नाही. पालिकेच्या दादर येथील विभाग कार्यालयात पालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चक्क जेवण पुरवणाऱ्या कॅटर्सने बंदी घातलेल्या प्लास्टिकमधून जेवण आणले. प्लास्टिक प्लेट, चमचे, प्लास्टिक ग्लास आणल्याचे लक्षात येताच पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने कॅटर्सकडून ४० हजार रुपयाचा दंड वसूल केला. पालिकेने आतापर्यंत केलेल्या कारवाईत ७५ हजार किलोहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले.

प्लास्टिक बॉटल्सवर बंदी नसल्याने त्याचा सर्रास वापर होतो. या बाटल्या रिकाम्या झाल्यानंतर टाकून दिल्या जात असल्याने त्याचा कचरा जमा होतो. यामुळे पालिकेत होणाऱ्या समित्यांच्या बैठकांमध्ये नगरसेवक आणि सदस्यांना काचेच्या ग्लासात पाणी देण्यात यावे, असे परिपत्रक प्रशासनाने काढले होते. त्यानंतरही पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा वापर केला जातो. प्लास्टिक बंदी १०० टक्के लागू व्हावी म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुढाकार घेतला आहे. महापौर कार्यालयात आणि बंगल्यावर प्लास्टिक ऐवजी काचेच्या बॉटल्स वापरण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. लोअर परेल येथील विभाग कार्यालयातही अशा काचेच्या बॉटल्स वापरल्या जात आहेत. याबाबत बोलताना मुंबईची प्रथम नागरिक म्हणून मी माझे कार्यालय आणि बंगल्यापासून काचेच्या बॉटल्स वापरण्यास सुरुवात केली आहे. टप्प्या टप्प्याने महापालिका कार्यालयात काचेच्या बॉटल्स वापरल्या जातील. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान लक्षात घेऊन नागरिकांनीही काचेच्या बाटल्यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Intro:मुंबई - राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी मुंबईतही केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या कार्यालयात आणि महापौर बंगल्यावर प्लास्टिक बाटल्यांवर बंदी घालून त्याऐवजी काचेच्या बाटल्या वापरण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. प्लास्टिक बंदीच्या अंलबजावणीसाठी मी माझ्या कार्यालय आणि बंगल्यापासून सुरुवात केली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी इतरांनीही त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन महापौरांनी केले आहे.Body:शिवसेनेचे युवा नेते व सध्याचे महाराष्‍ट्र राज्‍याचे पर्यावरण मंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या संकल्‍पनेतून राज्यात २३ जून २०१८ ला प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. त्यानुसार मुंबई महापालिकेने शहरात जोरदार कारवाई सुरु केली आहे. यामध्ये प्लास्टिक व थर्माकोल वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी आणि साठवणुकीवर बंदी घालण्यात आली. मार्केट, आस्थापना आणि परवाना विभागातील ३१० अधिकाऱ्यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले. या विशेष पथकाकडून कारवाई करण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत ६८ ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रेही सुरु करण्यात आली. मात्र अजूनही व्यावसायिक, दुकानदार तसेच फेरीवाल्यांकडून प्लास्टिकचा वापर सर्रास सुरु आहे. कारवाई सुरु असतानाही १०० टक्के प्लास्टिक बंद झालेली नाही. पालिकेच्या दादर येथील विभाग कार्यालयात पालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत चक्क जेवण पुरावणाऱ्या कॅटर्सने बंदी घातलेल्या प्लास्टिकमधून जेवण आणले. प्लास्टिक प्लेट, चमचे, प्लास्टिक ग्लास आणल्याचे लक्षात येताच पालिकेच्या संबंधित अधिका-याने कॅटर्सकडून ४० हजार रुपयाचा दंड वसूल केला. पालिकेने आतापर्यंत केलेल्या कारवाईत ७५ हजार किलोहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

प्लास्टिक बॉटल्सवर बंदी नसल्याने त्याचा सर्रास वापर होतो. या बाटल्या रिकाम्या झाल्यानंतर टाकून दिल्या जात असल्याने त्याचा कचरा जमा होतो. यामुळे पालिकेत होणाऱ्या समित्यांच्या बैठकांमध्ये समित्यांच्या बैठकांमध्ये नगरसेवक आणि सदस्यांना काचेच्या ग्लासात पाणी देण्यात यावे असे परिपत्रक प्रशासनाने काढले होते. त्यानंतरही पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॉटल्सचा वापर केला जातो. प्लास्टिक बंदी १०० टक्के लागू व्हवावी म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुढाकार घेतला आहे. महापौर कार्यलयात आणि बंगल्यावर प्लास्टिक ऐवजी काचेच्या बॉटल्स वापरण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. लोअर परेल येथील विभाग कार्यालयातही अशा काचेच्या बॉटल्स वापरल्या जात आहेत. याबाबत बोलताना मुंबईची प्रथम नागरिक म्हणून मी माझ्या कार्यालय आणि बंगल्यापासून काचेच्या बॉटल्स वापरण्यास सुरुवात केली आहे. टप्प्या टप्प्याने महापालिका कार्यालयात काचेच्या बॉटल्स वापरल्या जातील. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान लक्षात घेऊन नागरिकांनीही काचेच्या बॉटल्सचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

PKg आणि फोटो Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.