ETV Bharat / state

Mumbai Top 5 Markets : दसरा, दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईत यायचा प्लॅन करताय? मग या टॉप 5 मार्केटला नक्की भेट द्या

author img

By

Published : Sep 20, 2022, 2:01 PM IST

दसरा दिवाळीच्या खरेदीसाठी (Dussehra Diwali shopping) मुंबईत यायचा प्लॅन (Planning to visit Mumbai) करताय? मग या टॉप 5 मार्केटला नक्की भेट (Then definitely visit these top 5 markets) द्या. इथं मिळेल भन्नाट व्हरायटी. चला तर मग जाणुन घेऊया, मुंबईतील टॉपचे ते 5 पार्केट कोणते?

Mumbai top 5 markets
या टॉप 5 मार्केटला नक्की भेट द्या

मुंबई - सध्या दसरा, दिवाळी सारखे अनेक मोठे सण (Dussehra Diwali shopping) तोंडावर आहेत. त्यानंतर लगेचच तुळशीचे लग्न व लगीन सराई सुरू होईल. या पार्श्वभूमीवर अनेक जण मुंबईत खरेदीसाठी (Planning to visit Mumbai) येत असतात. मात्र, मुंबईत खरेदी नेमकी कुठे करायची? खरेदीसाठी कोणते मार्केट चांगले आहेत? याची अनेकांना माहिती नसते. आणि त्यांचा मुंबईत येऊन गोंधळ उडतो. त्यामुळे या सणासुदीला तुम्हाला जर मुंबईत खरेदीसाठी यायचं असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मुंबईतील पाच मोठ्या मार्केटची (Then definitely visit these top 5 markets) माहिती.

क्रॉफर्ड मार्केट : मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या मार्केटमध्ये पहिला नंबर लागतो तो क्रॉफर्ड मार्केटचा. हे मार्केट म्हणजे खरेदी प्रेमींसाठी हक्काचे ठिकाण. मुंबईतले सगळ्यात फेमस मार्केट. मुंबईचे पहिले मुन्सिपल कमिशनर आर्थर क्रॉफर्ड यांच्या नावावरून या मार्केटला क्रॉफर्ड मार्केट हे नाव पडलं. नंतर या मार्केटचे नाव बदलण्यात आलं आणि महात्मा ज्योतिबा फुले मार्केट ठेवण्यात आल. मात्र, या मार्केटला अजूनही जुन्या नावानेच ओळखले जाते. बरं हा झाला या मार्केटचा इतिहास. आता या मार्केटमध्ये नेमकं तुम्हाला काय काय मिळेल ते बघुया. हे मार्केट विशेषतः होलसेल मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे. इथं कोणती वस्तू मिळत नाही असं नाही. पण, हे मार्केट विशेष प्रसिद्ध आहे ते स्टेशनरी वस्तू आणि घरात शोभेसाठी लागणाऱ्या अँटिक वस्तूंसाठी. तुम्हाला जर घरात काही अशा वस्तू ठेवायच्या असतील तर या मार्केटला नक्की भेट द्या.

कुलाबा मार्केट : हे मार्केट विशेषतः महिला वर्गाच्या आवडीचे ठिकाण आहे. तुम्हाला या मार्केटला यायचं असल्यास टॅक्सी वाल्यांना कुलाबा कॉजवे सांगायचं ते तुम्हाला इथं आणून सोडतील. हे मार्केट विशेषता कपड्यांच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे कपडे मिळतील. डिझायनर आणि कॅज्युअल कपडे, कलरफुल चपला यांच्या अनेक व्हरायटी तुम्हाला या मार्केटमध्ये बघायला भेटतील. एखाद्या मोठ्या शोरूम पेक्षा अधिक व्हरायटी तेही सर्व सामान्य माणसाला परवडेल अशा दरात इथे मिळतात. त्यामुळे या मार्केटला नेहमीच लोकांची गर्दी असते.

भुलेश्वर मार्केट : घर सजवायला अँटिक वस्तू झाल्या, कपडे झालेत आता येऊयात दागिन्यांकडे. तुम्हाला जर वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने हवे असतील तर, तुमच्यासाठी भुलेश्वर मार्केट हा योग्य पर्याय आहे. तिथे तुम्हाला अनेक प्रकारचे दागिने मिळतील जे तुमचं सौंदर्य अधिक खुलवण्यास मदत करतात. या मार्केटच्या लँडमार्क सांगायचे झाल्यास हे क्रॉफर्ड मार्केटच्या अगदी बाजूलाच आहे. इथं गळ्यातील ज्वेलरी बांगड्या यांचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे या मार्केटमध्ये एकदा का महिला गेल्या की तीन-चार तास त्या काही बाहेर येत नाहीत. तेव्हा घर सजवण्याच्या वस्तू खरेदी करून दागिने घ्यायचे झाल्यास या मार्केटला एक चक्कर नक्की मारा.

चोर बाजार : ग्रँड रोड वरून मटण मार्केटला लागूनच हा बाजार भरतो. या चोर बाजाराबद्दल अनेक कहाण्या तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेल्या असतील. पण, जर खरच तुम्हाला काही विशेष खरेदी करायची असेल तर या मार्केटला नक्की भेट द्या. या मार्केटमध्ये तुम्हाला अनेक जुन्या विंटेज वस्तू खरेदी करता येतील. अनेक लोकांना घरात जुन्या काळातील वस्तू ठेवण्याची हौस असते ती जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर हा मार्केटचा पर्याय तुमच्यासाठी आहे. इथे तुम्हाला जुन्या वस्तू, जुने कॅमेरे, कंदील, जुन्या सिनेमांचे पोस्टर अशा अनेक जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या वस्तू मिळतील. विशेष म्हणजे अनेक चित्रपटांसाठी देखील याच भागातून काही वस्तू भाड्याने दिल्या जातात. या मार्केट बाबत अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असल्यास यावर आम्ही एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता तो देखील नक्की वाचा त्यातून तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

धारावी लेदर मार्केट : धारावी म्हटलं की कुणाच्याही डोळ्यासमोर उभे राहते ती झोपडपट्टी. नेहमीच गुन्हेगारीमुळे चर्चेत असणारा हा एरिया. पण, तुम्हाला विश्वास बसणार नाही एशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या याच धारावीत असे अनेक उद्योग चालतात की त्याची उलाढाल काही मिलियन डॉलर मध्ये आहे. धारावी विशेष प्रसिद्ध आहे ते लेदर मार्केटसाठी. धारावीत बनणाऱ्या चामड्याच्या वस्तूंना अगदी परदेशातून मागणी असते. यामध्ये चामड्याच्या पर्स, वॉलेट, बेल्ट, चप्पल, बूट अशा अनेक वस्तूंचा समावेश होतो. अनेक शौकीन लोक लेदर ची जॅकेट ऑर्डर प्रमाणे याच धारावी मार्केट मधून बनवून घेतात इथं बनणारी जॅकेट चप्पल आणि वॉलेट हे प्रदेशात निर्यात केले जातात इथल्या चामड्याच्या वस्तूंना प्रदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

तर, ही होती मुंबईतली पाच मोठी मार्केट. जिथे तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या व आपल्याला परवडतील अशा दरात सर्व काही वस्तू मिळतील. तेव्हा आता सणासुदीची खरेदी करण्यासाठी मुंबईत यायचे झाल्यास या मार्केटला नक्की भेट द्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.