मुंबई - कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक देशांमध्ये हवाई वाहतुकीवर निर्बंध घातले आहे. त्यातही एका व्यक्तीने एकट्याने विमान प्रवास केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ एका सामान्य नागरिकाचा नसून एका कंपनीच्या सीईओचा असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीसाठी एमिरेट्स एयरलाइंस या कंपनीने मुंबई ते दुबई प्रवास केल्याचे समोर आले आहे.
स्टारजेम्स ग्रुपचे सीईओ -
कोरोना विषाणूच्या संकट काळात संयुक्त अरब अमिरातीने घातलेल्या प्रवासी निर्बंधानुसार फक्त युएईचे नागरिक, युएई गोल्डन व्हिसा धारक आणि मुत्सद्दी मिशनचे सदस्य भारतहून युएईला जाऊ शकतात. त्यामुळे ४० वर्षीय भावेश जवेरी यांनी यांनी ३६० सीटर बोईंग ७७७ विमानात विशेष उड्डाण केले आहे. भावेश जवेरी स्टारजेम्स ग्रुपचे सीईओ आहे. दुबईमध्ये त्यांचे कार्यालय आहे. त्यामुळे भावेश यांना मुंबई ते दुबई नेहमीच विमानाने प्रवास करावे लागते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९ मे २०२१रोजी मुंबई ते दुबई केलेला प्रवास हा त्यांच्यासाठी विशेष ठरला आहे.
हेही वाचा - अंगावर येणारा समुद्र, लाटांच्या उंच भिंती... तौक्तेचे भयाण रुप व्हिडिओत कैद, पाहा अंगावर काटा आणणारी दृश्ये
आयुष्यातील अविस्मरणीय प्रवास -
भावेश जवेरी यांनी सांगितले की, मी मुंबई ते दुबई दरम्यान आतापर्यंत २४० वेळा विमान प्रवास केला आहे. मात्र, आतापर्यंतचे हे सर्वात चांगले उड्डाणे आहे. विमानात एकटा प्रवासी होतो. मी प्रवेश करताच सर्व एअरहोस्टेसेसने माझे स्वागत केले आणि टाळ्या वाजवल्या. उड्डाणादरम्यान, भावेश जवेरी यांनी खलाशी तसेच कमांडर यांच्याशीही विनंती करून १८ नंबरच्या जागेवर बसण्याची विनंती केली होती. विमानात मी एकटा असल्यामुळे मला माझ्या लकी नंबर आसनावर बसण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई ते दुबई प्रवास हा माझ्यासाठी अविस्मरणीय झाला आहे.
असा घडला प्रवास -
मुंबई ते दुबई या अडीच तासाच्या प्रवासासाठी ३६० सीटर बोईंग ७७७ विमानाला ८ लाख रुपयांचे इंधन लागले आहे. त्यामुळे या परिस्थिती मुंबई ते दुबई एका प्रवाशांसाठी घेऊन जाण्याचा निर्णय एमिरेट्स एयरलाइंस हा निर्णय वेगळा होता. दुबईमधून ३६० सीटर बोईंग ७७७ विमान हे प्रवासी घेऊन आले होते. हे विमान परत जाणार होते. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातच्या नियमानुसार भावेश जवेरी जाऊ शकता होते. त्यामुळे भावेश यांना एमिरेट्स एयरलाइंसने तिकीट दिले होते, अशी माहिती मुंबई विमान तळावरील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - कोरोना वॉर्डमध्ये घुमले बासरीचे स्वर, कोविड रुग्णाने वातवरण केल सकारात्मक