मुंबई - पूर्व उपनगरातील चेंबूर विभागात वाशी नाका परिसरात पाईप लाईनचा व्हॉल्व बदलतेवेळी रस्त्यावर पाणीच-पाणी झाले. यामध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. पिण्याचे पाणी पुरवठा करणारी ही पाईप लाईन पालिकेची आहे.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतूकीचा वेग काही वेळ मंदावला होता. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. पालिकेच्या जल विभागाकडून पाईप लाइनचा व्हॉल्व बदलण्यात आला त्यामुळे ते पाणी सोडले होते, असे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले आहे.