मुंबई : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा भीषण अपघातात ( Cyrus Mistry accident ) मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. अशातच पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पोलीस योग्यरित्या तपास करत नसल्याच्या आरोपाखाली सायरस मिस्त्री अपघात संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ( PIL filed in Bombay High Court ) दाखल करण्यात आली आहे.
याचिकेवर नवीन वर्षात सुनावणी : गुन्ह्यात आरोपी विरोधात अजामीन पात्र कलम दाखल करण्यात यावी अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात कलम 304 देखील लावण्यात लावे, अशी देखील याचिकेत मागणी केली आहे. पालघर येथील संदेश शिवाजी जेधे यांनी अॅड सादिक अली यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात ( PIL Filed In Bombay High Court ) आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात या जनहित याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सायरस मिस्त्री यांचा अपघात : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री ( Businessman Cyrus Mistry ) हे आपल्या कारने अन्य तीन मित्रांसह मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून येत असताना पालघरजवळ 4 सप्टेंबर 2022 रोजी कारला भीषण अपघात झाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव कार नदीच्या पुलाला जाऊन धडकली होती. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता.
मिस्त्री यांना 11 वेळा भरावा लागला होता दंड - भरधाव वेगामुळे सायरस मिस्त्री ( Cyrus Mistry Accident ) यांना 11 वेळा भरावा दंड भरावा लागला होता. ही माहिती समोर येत आहे. सायरस मिस्त्री एमएच 47 एबी 6705 या कारमधून प्रवास करायचे. दरम्यान 24 मे 2019 ते 15 एप्रिल 2022 अतिवेगाने एकूण १३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. सायरस मिस्त्री येत असलेली लक्झरी मर्सिडीज कार सुमारे 134 किलो मीटर प्रतितास वेगाने चालत होती हे समोर आले आहे. अपघातापुर्वी काही मिनिट आगोदरचे कारचे शेवटचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यावरुन रविवारी दुपारी २ वाजुन २१ मिनीटाला या कारने चारौती चेकपोस्ट ओलांडले. अपघाताचे ठिकाण येथून 20 किमी अंतरावर आहे. मर्सिडीज कारने हे अंतर अवघ्या 9 मिनिटांत पूर्ण केल्याचे समोर आल्यामुळे कारचा वेग जास्त होता हे समोर आले.