मुंबई - पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद देत, मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठी अर्ज सादर करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
2 मार्च पर्यंत करता येणार अर्ज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रखडलेल्या होत्या. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या अनेक अभ्यासक्रमाचे निकाल यंदा उशिरा लागलेल्या आहे. तसेच मुंबई विद्यापीठानेही पीएचडी आणि एमफीलच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज सुरू करण्यासाठी विलंब केला होता. त्यामुळे आता पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. त्यानुसार 2 मार्च, 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ही लिंक 26 फेब्रुवारीपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पेट परीक्षा 20 मार्च, 2021 नंतर ॲानलाइन पद्धतीने घेतली जाणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आलेली आहे.
पेट परीक्षेसाठी 10 हजार 64 अर्ज
मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी ते 18 मार्च, 2020 दरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागवले होते. त्यास तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत विद्यापीठाकडे पेट परीक्षेसाठी 10 हजार 64 इतके अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये पीएचडीसाठी 9 हजार 675 तर एमफीलसाठी 389 अर्ज प्राप्त झाले आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी दिली आहे.
हेही वाचा - मुंबईत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता; पालिका २४ नवीन कोरोना सेंटर सुरू करणार