मुंबई - गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांनी उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. देशासह राज्यात आजही पेट्रोलच्या किमतीत काही अंशी कमी जास्त फरक दिसून आला आहे. देशभरातील अनेक जिल्ह्यांत पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहेत. महाराष्ट्रातही पेट्रोलच्या दराने २ ते ३ रुपयांच्या फरकाने शंभरी गाठली आहे. तर काही जिल्ह्यात स्पीड पेट्रोलच्या किमतींनी शंभरी पार केली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील पेट्रोलचे दर जाणून घेतले असता, आज(मंगळवारी) परभणी जिल्ह्यात पेट्रोलचे सर्वाधिक दर असल्याचे दिसून आले, औरंगाबाद जिल्ह्यात प्रति लिटरसाठी ग्राहकांना ९७.५९ रुपये मोजावे लागत आहेत.
इंधन दरवाढीवरून केंद्रातील सत्ताधारी बोलायला तयार नाहीत, तर ऊठसूट आंदोलन करणारा राज्यातील विरोधी पक्ष भाजपा देखील मूग गिळून बसला असल्याची टीका सत्ताधारी शिवसेनेने मुखपत्र सामना मधून होत आहे. तर पेट्रोलच्या दराने शंभरी गाठल्याने सर्वसामान्य जनतेला महाघाईची झळ सोसावी लागत असून इंधन दरवाढीवरून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.
विविध जिल्ह्यातील इंधनाचे दर (प्रतिलिटर)
परभणी -
पेट्रोल - 98.86 डिझेल - 88.51
औरंगाबाद -
पेट्रोल - 97.59 डिझेल 87.53
पुणे -
पेट्रोल - ९६.९६ डिझेल 100.64
नाशिक -
पेट्रोल 97.34 डिझेल 86.77
ठाणे -
पेट्रोल 96.78 डिझेल 86.81
नागपूर-
पेट्रोल 97.83 डिझेल 88.97
जळगाव -
पेट्रोल 98.38 डिझेल 88.09 स्पीड पेट्रोल 101.21
मुंबई -
पेट्रोल 97.34 डिझेल 88.44
हिंगोली -
पेट्रोल- 98.20 स्पीड- 101.04 डिझेल- 87. 96
कोल्हापूर -
पेट्रोल - 97.53 डिझेल - 87.33