मुंबई - मुंबईच्या बहुचर्चित धारावी पुनर्विकास संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. माहिम नेचर पार्कला या पुनर्विकास प्रकल्पातून वगळण्यात यावे अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे. वनशक्ती सोबतच इतरांनी याचिका दाखल केली आहे. धारावीजवळ बीकेसी आणि माहिम खाडी दरम्यानचा पट्टा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. मात्र हा भाग या पुनर्विकास प्रकल्पात समाविष्ट नाही अशी हमी कोर्टात एमएमआरडीएने दिली आहे. कोर्टाने राज्य सरकारला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 जानेवारीला होणार आहे.
मुंबईच्या बहुचर्चित धारावी पुनर्विकास संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल - धारावी पुनर्विकास संदर्भात उच्च न्यायालयात याचिका
धारावी पुनर्विकास संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. धारावीजवळ बीकेसी आणि माहिम खाडी दरम्यानचा पट्टा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 जानेवारीला होणार आहे.