ETV Bharat / state

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींची तुरुंगातच होणार चौकशी - Suicide

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही डॉक्टरांना पोलीस कोठडी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींची तुरुंगातच होणार चौकशी
author img

By

Published : Jun 6, 2019, 7:09 PM IST

मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही डॉक्टरांना पोलीस कोठडी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडे तपास आल्याने आरोपींच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळविण्यासाठी गुन्हे शाखेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. परंतु या आरोपींची न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगात चौकशी करण्याची गुन्हे शाखेला परवानगी देण्यात आली आहे.

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येनंतर या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आगरिपाडा पोलीस ठाण्याकडून राज्य सरकारने गुन्हे शाखेकडे सोपवला होता. दरम्यान, सत्र न्यायालयाकडून नायर रुग्णालयातील तिन्ही डॉक्टर आरोपींना 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुरुवारी दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि 7 जून ते 9 जून पर्यंत सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चौकशीसाठी आरोपींचा ताबा तुरुंगातच मिळणार आहे. येत्या सोमवारी या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Intro: डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही डॉक्टरांची पोलिस कोठडी देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. डॉ पायल तडवी यांच्या आत्महत्येनंतर या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आगरिपाडा पोलीस ठाण्याकडून राज्य सरकारने क्राईम ब्रँचकडे सोपविला होता. दरम्यान सत्र न्यायालयाकडून नायर रुग्णालयातील तिन्ही डॉक्टर आरोपीना 10 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सूनविण्यात आली होती. तपास गुन्हे शाखेकड़े आल्याने आरोपींच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळविण्यासाठी गुन्हे शाखेकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. Body:मात्र गुरुवारच्या सुनावणीत क्राईम ब्रँच ची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली जरी असली तरी या तिन्ही आरिपींची न्यायालयीन कोठडीत असताना तुरुंगात चौकशी करण्याची क्राईम ब्रँचला मुभा देण्यात आली आहे.
गुरुवारी दुपारी २ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आणि 7 जून ते 9 जून पर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चौकशीसाठी आरोपींचा ताबा तुरुंगातच क्राईम ब्रांचला मिळणार. येत्या सोमवारी या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर विशेष कोर्टात सुनावणी होणार आहे.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.