ETV Bharat / state

Shashikant Warishe Murder Case : धक्कादायक! पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरण; पियुसीएल संघटनेने केला 'हा' आरोप - Journalist Shashikant Warishe Murder

पत्रकार शशिकांत वारसे यांच्या निघृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेत पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज अर्थात पीयुसीएल या मानवाधिकारासाठी लढणाऱ्या वकिलांच्या संघटनेने गंभीर आरोप केला आहे. पीयुसीएलने याप्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Mumbai Crime
शशिकांत वारसे
author img

By

Published : Feb 8, 2023, 8:43 PM IST

मुंबई : पत्रकार शशिकांत वारसे यांच्या निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात तेथील जनता विरोध करीत आहे. या संदर्भात त्या भागात तणाव आहे आणि त्या संपूर्ण परिस्थितीचे वार्तांकन करणारे पत्रकार शशिकांत वारसे यांची चालत्या गाडीमधून खाली पाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज संघटनेने केला आहे.

हत्या केल्याचा आरोप : राजापूर महामार्गाजवळ सोमवार (6 फेब्रुवारी) रोजी स्थानिक जमीन व्यापारी पंढरीनाथ आंबेरकर याने कथितपणे चालविलेल्या कारने खाली पाडून पत्रकार शशिकांत वारीशे यांची निर्घृण हत्या केल्याने धक्का बसलयाचे पियुसीएलने म्हटले आहे. पत्रकार शशिकांत यांना गंभीर दुखापत झाली आणि जवळच्या लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र त्यांना जबर मार लागल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा हा मृत्यू म्हणजे त्यांची हत्याच आहे, असा आरोप जनरल सेक्रेटरी लारा जेसानी यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण : मृत पत्रकाराने ‘महानगरी टाइम्स’ या स्थानिक वृत्तपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंढरीनाथ आंबेरकर यांच्या छायाचित्रांसह बॅनरबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. पंतप्रधानासह राज्यातील उपमुख्यमंत्री आणि आंबेकर यांच्या बाबतची ही बातमी 6 फेब्रुवारी रोजी स्थानिक वृत्तपत्रात महानगरी टाइम्समध्ये प्रसिद्ध झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेरकर हे त्यांच्या SUV वाहनात (MH08AX6100) महामार्गावरून जात असताना त्यांनी वारिसे यांना त्यांच्या दुचाकीमध्ये पाहिले. त्यांनी वाहन वळवले आणि वारीशेमध्ये नेले असल्याचे जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. मिहीर देसाई यांनी म्हटले आहे.

वाहनाखाली चिरडले गेले? : वारिसे यांची दुचाकी वाहन हे आंबेरकर यांच्या एसयूव्ही ह्या गाडीच्या चाकाखाली कशाप्रकारे चिरडले गेले, हे फोटोग्राफिक पुराव्यातून स्पष्टपणे समोर येते. संपूर्ण प्रकरणाच्या तपशीलाची प्रतीक्षा असताना, वारिसे यांना त्यांच्या वृत्तपत्रातील लेखामुळे लक्ष्य करण्यात आले होते. ज्यात आंबेरकर यांच्याविरुद्ध जमीन हडप केल्याप्रकरणी पत्रकाराने एफआयआर दाखल केला असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे, अशी माहिती देखील लारा जेसानी यांनी दिली आहे

पियुसीएल संघटनेने काय सांगितले : कोकणातील रिफायनरी संदर्भात जनतेच्या समस्या वृत्तपत्रातून मांडणे आणि जनतेचा आवाज बनणे हे पत्रकार शशिकांत यांनी केले होते. त्याच पत्रकाराची हत्या होणे म्हणजे बोलण्याचे धाडस करणार्‍यांना गप्प करण्यासाठी हत्या केली आहे. तसेच अन्याय करणाऱ्या विरोधात ब्र काढाल तर धमकावण्यासाठी हे सुरू आहे. आणि प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या नावाखाली सुरू असलेल्या जमीन बळकावणे ह्या बेकायदेशीर बाबी उघडकीस आणल्यामुळे पत्रकार शाहिकांत यांची हत्या रचण्यात आली आहे, असे पियुसीएल महाराष्ट्र अध्यक्ष अ‍ॅड. मिहीर देसाई यांनी नमूद केले.

कोकणातील रिफायनरी प्रकल्प : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये रिफायनरी प्रकल्प होत आहे. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या जागेवरून नागरिकांच्या सुरू असलेल्या आंदोलनात नागरी स्वातंत्र्याचे मोठे उल्लंघन झाले आहे. नाणारमध्ये हा प्रकल्प रद्द करण्यात आला असला तरी तो 20 किलोमीटर अंतरावरील बारसू-सोलगाव गावात हलवण्यात आला आहे. स्थानिक रहिवाशांनी पर्यावरणाच्या नाशाच्या विरोधात सतत आवाज उठवला आहे. आणि मेगा-कोटींच्या रिफायनरीमुळे प्रदूषणाची गंभीर भीती जाणकारांनी आधीच व्यक्त केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

सखोल चौकशीची मागणी : यासंदर्भात अ‍ॅड. मेहेर देसाई यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद साधला असता ते म्हणाले की, कोकणामधील रिफायनी विरोधात संघर्ष करणाऱ्या स्थानिक लोकांच्या संघटनेच्या वतीने पत्रकार शशिकांत यांची केली गेलेली हत्या याची चौकशी झाली पाहिजे. तसेच आरोपीला लवकरात लवकर चौकशी करून कठोर शिक्षा देखील झाली पाहिजे. या प्रकारची मागणी स्थानिक जनतेने केलेली आहे. या स्थानिक जनतेच्या मागणीला पीपल युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज देखील समर्थन देते. संबंधित शासकीय यंत्रणांनी याची युद्धपातळीवर दखल घ्यावी तसेच सखोल चौकशी करावी. शांतपणे आंदोलन करणाऱ्या स्थानिक जनतेवर खोटे गुन्हे जे नोंदवलेले आहेत ते मागे घेण्यात यावेत. जनतेच्या भावभावना आणि जनतेच्या मागण्या लक्षात घेऊन शासनाने यावर त्वरित चौकशी केली पाहिजे.

हेही वाचा : Mumbai Crime: आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीसमोर हस्तमैथून करणे कार चालकाला पडले भारी....वाचा सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.