मुंबई- एरवी पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. कडाक्याचा उकाडा, अवकाळी पाऊस अशा घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर जंगल नष्ट होत असल्याने प्राणी-पक्षीदेखील बेघर झाले आहेत. जंगल नसल्याने भटकत हे प्राणी शहराकडे येतात आणि येथे त्यांची मनुष्यांशी झुंज होते. सध्या कोरोनामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाटाचे वातावरण आहे. त्यामुळे, शांतीची चाहूल होऊन बाबुलनाथ परिसरात काही मोरांनी मुक्तसंचार केल्याचे दिसून आले.
लॉकडाऊनमुळे प्राणी-पक्षांचे अच्छे दिन आले आहेत. संचारबंदी असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांनी शहरात वावरणे टाळले आहे. फक्त आत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठीच लोक घराबाहेर पडत आहे. वाहतूक व्यवस्थाही बंद आहे. त्यामुळे, प्रदूषणाचे प्रमाण काहीसे घटल्याचे समजले आहे. त्यामुळे, मनुष्यांसह प्राणीमात्रांनादेखील शुद्ध हवेचा आनंद घेता येत आहे. रस्त्यावर वाहतूक नसल्याने आणि वाहनांचा आवाज नसल्याने प्राणीदेखील मुक्त संचार करताना दिसून येत आहे. शहरातील बाबूलनाथ परिसरात मोरांचे मुक्तसंचार होतानाचे दृष्य कॅमेऱ्यात टिपण्यात आले आहे. या मोरांची अदा बघून मुंबईकर सुखावले आहेत.
हेही वाचा- Coronavirus : राज्यात 5 हजार 343 जण कोरोना बधितांच्या संपर्कात - राजेश टोपे