ETV Bharat / state

Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्याकांडमध्ये आरोपीकडून वापरण्यात आलेले पिस्तुल बिहारमधून आणले; न्यायालयात माहिती - पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण

महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित हायप्रोफाइल खटला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात (Pawanraje Nimbalkar Murder Case) आज मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Session court) विशेष कोर्टामध्ये माफीचा साक्षीदार पारसमल जैनची उलटतपासणी (Cross exam of Parasmal Jain) आरोपी क्रमांक 1 पदमसिंह पाटील यांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी घेतली आहे. या तपासणी दरम्यान परसमल जैन यांनी म्हटले आहे की, या हत्येकरिता वापरण्यात आलेले बंदूक (Pistol used by accused brought from Bihar) बिहारच्या शिवानमधून विकत आणले होते. (Latest news from Mumbai) या प्रकरणात पुढील उलट तपासणी 23 जानेवारी रोजी होणार आहे. (Mumbai Crime)

Pawanraje Nimbalkar Murder Case
पवनराजे निंबाळकर हत्याकांड
author img

By

Published : Jan 4, 2023, 7:53 PM IST

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी बोलताना वकील

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांना त्यांचा चुलत भाऊ आणि स्थानिक काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्यावर जून 2006 मध्ये हत्या (Pawanraje Nimbalkar Murder Case) केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील माफीचे साक्षीदार असलेले आरोपी पारसमल जैन यांची आज पुन्हा उलट तपासणी (Cross exam of Parasmal Jain) करण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी अनेक धक्कादायक असे खुलासे केले आहे. या हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या बंदूक बिहारमधून (Pistol used by accused brought from Bihar) तर गाडी ठाण्यातून विकत घेण्यात आली होती. मात्र या संदर्भातील कुठलेही डॉक्युमेंट उपलब्ध नसल्याचे देखील आरोपीने उलट तपासणी दरम्यान न्यायालयासमोर (Mumbai Session court) सांगितले आहे. (Latest news from Mumbai) ही हत्या होण्यापूर्वी तत्कालीन जॉईट सीपी राकेश मारिया यांच्यासोबत या प्रकरणातील आरोपी सोबत गेले असता भेट झाली होती. असे देखील आरोपीने उलट तपासणी दरम्यान न्यायालयासमोर सांगितले आहे. (Mumbai Crime)

उलट तपासणी करण्याची परवानगी : मुंबई सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांच्या कोर्टात आज सुनावणी झाली आहे. माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या मॅजिस्ट्रेट समोर नोंदवण्यात आलेले 2 जबाब आणी कोर्टातील तिसऱ्या जबाबात तफावत असल्याचे म्हटले आहे. जैन यांची दोन दिवसां उलट तपासणी करण्याकरिता परवानगी पदमसिंह पाटील यांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी मागितल्यानंतर न्यायालयाने त्यांना 23 ते 24 जानेवारी सलग दोन दिवस उलट तपासणी करण्याची परवानगी दिली आहे.

9 आरोपींना अटक : आज झालेल्या सुनावणी दरम्यान या प्रकरणातील 3 आरोपी कोर्टात हजर होते. या प्रकरणात सीबीआयने 9 आरोपींना अटक केले होते. यातील 3 आरोपी 2009 पासून कारागृहात आहे. पिंटू सिंग, दिनेश तिवारी, पारसमल जैन अजूनही कारागृहात आहे. तर,पद्मासिंह पाटील, सतीश मंदाडे, कैलास यादव,छोटू उर्फ द्यानेंद्र पांडे, शशिकांत कुलकर्णी हे जामीनावर आहे. या खटल्यात 128 साक्षीदार आहे.

काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन खासदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील आहेत प्रमुख आरोपी आहे. त्यांचा चुलत भाऊ आणि स्थानिक काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची 3 जून 2006 मध्ये झालेली हत्या झाली होती. पनवेलला पनवेलजवळील कळंबोली येथे नेले जेथे 3 जून 2006 रोजी निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची दोन भाड्याच्या मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. राजकीय वर्चस्वातून पवनराजे यांची हत्या केल्याचा आरोप आहे 2009 ला CBI तपासात पद्मासिंह पाटील हे आरोपी केली होती. सक्खा चुलतभाऊ पवनराजे याची हत्या 30 लाखांची सुपारी देऊन पद्मासिंह यांनी केल्याचा ठपका CBI ने ठेवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.