ETV Bharat / state

पवई तलावाची डम्पिंग कडे वाटचाल?

पवई तलावांमध्ये वाढलेली जलपर्णी, तलावात रोज पडत असलेला कचरा, दारूच्या बॉटल्या, प्लास्टिक यामुळे तलावावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे तलावाचे अस्तित्व धोेक्यात आले आहे.

पवई तलाव
author img

By

Published : May 12, 2019, 10:40 PM IST

मुंबई- पवई तलावांमध्ये वाढलेली जलपर्णी, तलावात रोज पडत असलेला कचरा, दारूच्या बॉटल्या, प्लास्टिक यामुळे तलावावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. तेथे बिनधास्त केंब्रिज टाकले जाते याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे काही महिन्यापासून तलावाची सफाई झालेली नाही. तलावातील जलचर प्राणी, मगरी, मासे यांच्या जीवाला धोका वाढलेला आहे. त्यामुळे पवई तलावाची वाटचाल डम्पिंग कडे होत आहे का ? असा प्रश्न येथे फिरायला येणारे नागरिक चंद्रकांत ओमकार शिंपी यांना वाटत आहे.

महानगरपालिकेने तलावाची दुरुस्ती लवकरात लवकर करून तलावाची शोभा वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिका ५० कोटी रुपये खर्च करून या तलावाचे सुशोभीकरण करणार होती त्यात खास कोक्रोडाईल पार्क बनवण्यात येणार होते. मात्र सुशोभीकरण लांबणीवर पडल्याने हा पार्कही होणार नाही. मेट्रो रेल्वेच्या सहाव्या टप्प्याचा विक्रोळी ते जोगेश्वरी हा मार्ग पवई तलावाच्या परिसरातून जात असल्याने सुशोभीकरणाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. मेट्रो रेल्वेचा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे .तोपर्यंत हे सुशोभीकरण होणार नसल्याने पाण्यातील जीव धोक्यात आले आहेत. येथे तरुण पिढी आडोशाला दारू ढोसत बसलेले आढळतात आणि दारूच्या बाटल्या खाली झाल्यानंतर सरळ गवताच्या आत फेकतात. त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात रोज पडत असतो.

पवई तलावात पाणी वर्षभर राहत असल्याने या तलावात मोठया प्रमाणात जलचर प्राण्यांचा वावर पाहायला मिळतो. तलावात वाढलेल्या जलपर्णी कचऱ्यामुळे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. तलावात घाण सांडपाणी यामुळे पाण्याच्या दर्जा खालावला आहे. या तलावात सर्रास मलजल आणि सांडपाणी १७ व्हॉल्व वाहिन्यातून सोडले जाते. त्यामुळे तलावातील पाण्याचा दर्जा खालावला आहे. मुंबई उपनगरातील महत्त्वाचा असलेला हा पवई तलाव २२० हेक्‍टरवर पसरलेला आहे. या तलावातील पाणी औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. सध्या तलावात पाणी शुद्ध करण्यासाठी एकच मशीन कार्यरत आहे. असे स्थानिक रहिवाशी सांगतात. पाणी शुद्ध नसल्याने जलपर्णी वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे.

तलावात मच्छिमारी करणारा राजू म्हणाला की, जलपर्णी वाढली आहे. तलावातील घाण पाण्यामुळे मासे कमी झाले आहेत. घाण पाणी आत सोडले असल्याने पाण्याचा वास येतो त्यामुळे पाण्यात जायला कोणी तयार होत नाही. आत गेल्यावर अंगाला खाज सुटते. तलावाचे अस्तित्व धोक्यात येत आहे. कचऱ्याच्या प्रमाण वाढले आहे. मी ३० वर्षांपूर्वी पाणी पिण्यासाठी वापरत होतो. पण आता घाणीमुळे भीती वाटते. त्यामुळे महानगरपालिकेने तलावाची दुरुस्ती लवकरात लवकर करून तलावाची शोभा वाढवावी.

Intro:पवई तलावाची डम्पिंग कडे वाटचाल?

पवई तलावांमध्ये वाढलेली जलपर्णी तलावात रोज पडत असलेला कचरा दारू च्या बॉटल प्लॅस्टिक यामुळे तलावावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे तिथे बिनधास्त केंब्रिज टाकले जाते याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे काही महिन्यापासून तलावाची सफाई झालेली नाही. तलावातील जलचर प्राणी मगरी मासे त्यांच्या जिवाला धोका वाढलेला आहे.त्यामुळे पवई तलावाची वाटचाल डम्पिंग कडे होत आहे का ?असा प्रश्न येथे फिरायला येणारे जेष्टनागरिक चंद्रकांत ओमकार शिंपी यांना वाटत आहे.Body:पवई तलावाची डम्पिंग कडे वाटचाल?

पवई तलावांमध्ये वाढलेली जलपर्णी तलावात रोज पडत असलेला कचरा दारू च्या बॉटल प्लॅस्टिक यामुळे तलावावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे तिथे बिनधास्त केंब्रिज टाकले जाते याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे काही महिन्यापासून तलावाची सफाई झालेली नाही. तलावातील जलचर प्राणी मगरी मासे त्यांच्या जिवाला धोका वाढलेला आहे.त्यामुळे पवई तलावाची वाटचाल डम्पिंग कडे होत आहे का ?असा प्रश्न येथे फिरायला येणारे जेष्टनागरिक चंद्रकांत ओमकार शिंपी यांना वाटत आहे.

मेट्रो रेल्वेच्या सहाव्या टप्प्याचा विक्रोळी ते जोगेश्वरी हा मार्ग पवई तलावाच्या परिसरातून जात असल्याने सुशोभीकरणाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे.अशी माहिती पालिकेकडून सांगितले जाते.
पवई तलावात पाणी वर्षभर राहत असल्याने या तलावात मोठया प्रमाणात जलचर प्राण्यांचा वावर पाहायला मिळतो. तलावात वाढलेल्या जलपर्णी कचऱ्यामुळे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे मुंबई महानगरपालिका 50 कोटी रुपये खर्च करून या तलावाचे सुशोभीकरण करणार होती त्यात खास कोक्रोडाईल पार्क बनवण्यात येणार होते मात्र सुशोभीकरण लांबणीवर पडल्याने हा पार्कही होणार नाही. मेट्रो रेल्वेचा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे .तोपर्यंत हे सुशोभीकरण होणार नसल्याने पाण्यातील जीव धोक्यात आले आहेत.येथे तरुण पिढी आडोशाला बसत दारू ढोसत बसलेले आढळतात आणि दारूच्या बाटल्या खाली झाल्यानंतर सरळ गवताच्या आत फेकतात त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात रोज पडत असतो.

तलावात घाण सांडपाणी यामुळे पाण्याच्या दर्जा खालावला आहे.

या तलावात सर्रास मलजल आणि सांडपाणी 17 व्हॉल्व वाहिन्यातून सोडले जाते. त्यामुळे तलावातील पाण्याचा दर्जा खालावला आहे.
मुंबई उपनगरातील महत्त्वाचा असलेला हा पवई तलाव 220 हेक्‍टरवर पसरलेला आहे या तलावातील पाणी औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. सध्या तलावात पाणी शुद्ध करण्यासाठी एकच मशीन कार्यरत आहे.असे स्थानिक रहिवाशी सांगतात. पाणी शुद्ध नसल्याने जलपर्णी वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे.

तलावात मच्छिमारी करणारे राजू म्हणाला की, जलपर्णी वाढली आहे. तलावात मासे घाण पाण्यामुळे कमी झाले आहेत. घाण पाणी आत सोडले असल्याने पाण्याचा वास येतो पाण्यात कोणी आत जायला तयार होत नाही. आत गेल्यावर अंगाला खाज सुटते .तलावाचे अस्तित्व धोक्यात येत आहे. कचऱ्याच्या प्रमाण वाढले आहे.मी 30 वर्षांपूर्वी पाणी पिण्यासाठी वापरत होतो पण ते आता घाणीमुळे भीती वाटते .त्यामुळे महानगरपालिकेने तलावाची दुरुस्ती लवकरात लवकर करून तलावाची शोभा वाढवावी.
.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.