मुंबई - ज्याप्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्याप्रमामे नागरिकांमध्ये कोरोनाची भीतीही वाढू लागली. याच भीतीतून आता एंजाइटी डिसऑर्डर अर्थात दडपणाच्या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत.
आपल्याला कोरोना होऊ शकतो. यामुळे आपल्याला आणि आपल्या परिवाराला धोका होऊ शकतो, या भीतीने काही जण दिवसभरात सॅनिटयझरच्या चार बटल्या संपवत आहे. दिवसभरातून दोनपेक्षा जास्तवेळा अंघोळ करत आहेत. कोरोना होईल, या भीतीने सतत हात धुवत आहेत. ही केवळ भीती नसून हा एक मानसिक आजार आहे. एंजाइटी डिसऑर्डर म्हणजे दडपण, असा मानसिक आजार होत आहे. या आजारामुळे दडपण वाढते. त्यामुळे भीती वाटून रक्तदाब वाढणे, जास्त भीती वाटणे, भीतीने घाम येणे, रक्तदाब वाढल्यानंतर श्वसनासही त्रास होणे, असा त्रास यामुळे होऊ शकतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिली.
याबाबत काळजी कशी घेता येईल अशी विचारणा डॉ. मुंदडा केली. यावर ते म्हणाले, कोरोनाबाबत भीती न बाळगू नये, याबाबत जागरूकता बाळगावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. सतत हात न धुता किमान तासातून एकदा हात धुवा. कोरोनाबाबातची भीती मनातून काढून योग्य ती काळजी घ्यावी. सतत याबाबात भीती वाटत असेल. कोरोना झाला आहे, असा विचार येत असेल. मरण्याची सतत भीती वाटत असेल, तर मानसोपचार तज्ज्ञांची भेट घ्यावी, यामुळे पुढे होणारा धोका टाळता येईल. तसेच सतत टीव्ही बघू नका, सोशल मीडियापासून शक्य तितके दूर राहा असो सांगितले.
हेही वाचा - पालिकेचे यश; कस्तुरबा रुग्णालयातील कोरोनाचे १२ रुग्ण झाले बरे