मुंबई : आत्महत्येचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई सेंट्रल परिसरात असलेल्या नायर रुग्णालयात धक्कादायक घटना घडली. मंगळवारी एका रुग्णालय रुग्णाने आत्महत्या केल्याची दुखद घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव अविनाश सावंत (वय 40) असे आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपंग व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. अविनाश सावंत हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी आहे.
आत्महत्येमागचे नेमके कारण : अविनाश सावंत यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना काही महिन्यांपूर्वी उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या मूळ गावी बरे होऊन जाण्याआधी अविनाश सावंत यांनी नायर रुग्णालयातच आपले जीवन संपवले आहे. उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी अविनाश सावंत यांनी आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेने नायर रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. अविनाश सावंत यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
अपमृत्यूची नोंद : नायर रुग्णालयात हृदयविकारावर उपचार घेत असलेल्या एका 40 वर्षीय रुग्णाने रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. अविनाश सावंत असे या रुग्णाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी आग्री पाडा पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर आग्री पाडा पोलीस तात्काळ हॉस्पिटलमध्ये घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आग्री पाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली. आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीस तपास : आग्रीपाडा पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरु केला आहे. आग्री पाडा पोलिसांना या प्रकरणी अद्याप सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहे. या आत्महत्या प्रकरणी पोलीस तपास करत आहे. मृत अविनाश सावंत यांच्या घरच्यांकडे आणि रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात येणार आहे. जेणेकरून मृत अविनाश सावंत हे कोणत्या तणावाखाली होते का? किंवा त्यांना आजाराची भीती वाटत होती का? याबाबत पोलीस चौकशी करणार आहेत. त्याचप्रमाणे अविनाश सावंत यांच्या आत्महत्यामागे अजून काही दुसरे कारण आहे का? याबाबत पोलीस तपास करणार आहेत.