ETV Bharat / state

BEST Bus Service : बेस्टच्या प्रवाशांना गुड न्यूज, पुढील वर्षी एसी डबलडेकर बस सह टॅक्सी सेवा - AC double decker BEST bus service

बेस्टच्या प्रवाशांना एसी डबल डेकर बस सेवा ( AC double decker bus service for best passengers ) पुढील वर्षापासून मिळणार आहे. ओला उबरच्या तुलनेत ( AC double decker bus service ) प्रवाशांना एसी डबल डेकर बस सेवा मकरसंक्राती दिनी ( Makarasankrat day ) उपलब्ध होणार आहे.

AC double decker bus service
एसी डबल डेकर बस सेवा
author img

By

Published : Dec 2, 2022, 8:00 PM IST

मुंबई - बेस्ट उपक्रम आपल्या प्रवाशांना नवनवीन योजना ( AC double decker bus service for best passengers ) नवनवीन सोयी सुविधा देत असते. येत्या नवीन वर्षात मकरसंक्राती दिनी ( Makarasankrat day ) (१४ जानेवारी रोजी) बेस्टच्या प्रवाशांना एसी डबल डेकर बस ( AC double decker bus service ) ओला उबरच्या तुलनेत कमी खर्चात प्रवास करण्यासाठी टॅक्सी सेवा सुरु केली जाणार आहे. पुढील आर्थिक वर्षात प्रवाशांना ( AC double decker BEST bus service ) आणखी चांगल्या सुविधा देऊन प्रवाशांची संख्या ४५ लाखांवर नेण्याचा मानस असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

पुढील महिन्यात डबलडेकर बसेस - बेस्ट उपक्रमाकडून सन २०२३ - २४ चा २००१ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंग चहल यांच्याकडे सादर केला आहे. या अर्थसंकल्पाबाबत माहिती लोकेश चंद्र बोलत होते. यावेळी बोलताना बेस्टच्या सध्या सुरु असलेल्या डबलडेकर बसेस लवकरच ताफ्यातून बाद होणार आहेत. त्याजागी ९०० एसी ईलेकट्रीक डबलडेकर बसेस आणल्या जाणार आहेत. त्यापैकी ५० एसी डबलडेकर बसेस १४ जानेवारीला (मकरसंक्रात) बेस्टच्या ताफ्यात येतील. पुढील वर्षी डिसेंबर २०२३ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात ९०० एसी डबलडेकर बसेस तसेच २१०० सिंगलडेकर इलेक्ट्रिक एसी बसेस दाखल होतील अशी माहिती लोकेश चंद्र यांनी दिली.

जुलै पर्यंत ५०० टॅक्सी - मुंबईमधील ओला, उबेरची तसेच काळी पिवळी टॅक्सीचा मुकाबला करण्यासाठी बेस्ट स्वतःची टॅक्सी सेवा उपलब्ध करून देणार आहे. या सर्व टॅक्सी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या असल्याने त्याचे भाडे इतर टॅक्सी सेवांच्या तुलनेत कमी असेल. येत्या जुलै पर्यंत बेस्टकडून ५०० टॅक्सी सुरु केल्या जातील. यामुळे सध्या जे नागरिक आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन घराबाहेर पडत आहेत त्याचे प्रमाण कमी होऊन ट्रॅफिकची समस्या काही प्रमाणात कमी होईल असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

प्रवाशांची संख्या वाढवण्यावर भर - १ लाख लोकसंख्येसाठी ६० बस हव्या आहेत. मुंबईत मात्र १ लाख लोकसंख्येसाठी २२ बस आहेत. येत्या काळात एसी, इलेक्ट्रिक, डबलडेकर, सिंगलडेकर बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे डिसेंबर २०२३ पर्यंत बेस्टचा ताफा ६ हजार बस इतका होणार आहे. येत्या काही वर्षात हा ताफा १० हजार इतका केला जाणार आहे. बेस्टने सध्या ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टच्या ताफ्यात नवीन बसेस आल्यावर प्रवाशांची संख्या ४५ लाख पर्यंत होईल असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

वॉटर टॅक्सी चालवण्याचा विचार - शिपिंग मंत्रालय मेरीटाइम बोर्ड सागरमाला प्रकल्पावर काम करत आहे. मुंबई आणि एमएमआरमध्ये अनेक ठिकाणी जेट्टी बांधण्याचे काम सुरू आहे. सरकारने आम्हाला वॉटर टॅक्सी चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावावर आम्ही विचार करत आहोत. आमच्याकडे वॉटर टॅक्सी चालवण्यासाठी संसाधने आणि मनुष्यबळ आहे. आम्ही आमचा अहवाल लवकरच सरकारला सादर करणार आहोत असे लोकेश चंद्र म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.