मुंबई - पार्किन्सन आजारांबद्दल व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला सांगणार आहोत. सध्या समाजिक माध्यमावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पार्किंन्सन आजार काही मिनिटात बरा करता येतो असा दावा करण्यात येत आहे. मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये मॉर्फिन नावाचे इंजेक्शन चमत्कारिकरित्या पार्किन्सन्स आजार बरा करीत असल्याचा व्हिडियो सध्या सगळीकडेच धुमाकुळ घालतो आहे. मात्र, इटीव्ही भारत या व्हिडिओची पुष्ट करत नाही. या संदर्भात केलेल्या पडताळणीत हा व्हिडिओ तीन वर्षांपूर्वीचा असल्याचे पहायला मिळाले. इट तसेच मॉर्फिन इंजेक्शनचा प्रभाव फक्त 30 ते 40 मिनिटे राहतो असा दावा तज्ञांनी व्यक्त केला आहे.
काय आहे पार्किन्स आजार : पार्किन्सन रोग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणाऱ्या पेशींवर परिणाम करतो. तेव्हा व्यक्तीला सामान्य शारीरिक क्रिया करण्यास त्रास होतो. पार्किन्सन्सचा पुरुष, स्त्रियांवर समान परिणाम होतो. भारतातील पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळुन येते. पार्किन्सन रोग हा मेंदूत होणारा न्यूरोलॉजिकल विकार आहे. पार्किन्सन रोग हा मुळात एक न्यूरोडीजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये डोपामाइन, मेंदूतील घटक, शरीराच्या स्नायूंची सुरळीत, समन्वित हालचाल सक्षम करते. डोपामाइन हे मेंदूच्या एका भागामध्ये तयार होते. ज्याला सबस्टॅंशिया निग्रा म्हणतात. पार्किन्सन्स रोगात, निग्राच्या सब्सटॅन्शियामधील पेशी मरायला लागतात. जेव्हा डोपामाइनची पातळी 60 ते 80 टक्क्यांपर्यंत खाली येते तेव्हाच या आजाराची लक्षणे दिसायला लागतात. यावर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
पार्किन्सन रोगाची लक्षणे : शरीर थरथरणे, कडकपणा, शरीराच्या अवयवांची मंद हालचाल ही पार्किन्सन रोगाची मुख्य लक्षणे आहेत. या लक्षणांव्यतिरिक्त, पार्किन्सन रोगाची इतर लक्षणे आहेत, जसे की शरीराची स्थिती सामन्य राखण्यात अडचण, बोलण्यात अडचण, लघवी करण्यास त्रास होणे, रात्री झोपण्यास त्रास होणे आदी लक्षणांचा यात समावेश होतो.
पार्किन्सन रोगाचे पाच टप्पे : हा पार्किन्सन्सचा सर्वात सौम्य प्रकार आहे. पहिल्या टप्प्यात, तुम्हाला कोणतीही लक्षणीय लक्षणे जाणवू शकत नाहीत. यामुळे तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येत नाही. स्टेज 1 पासून स्टेज 2 पर्यंत जाण्यासाठी काही महिने किंवा वर्षे लागू शकतात. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे अनुभव येतात. या मध्यम स्तरावर, तुम्हाला लक्षणे दिसून येतात. स्नायू कडक होणे, कंपने चेहर्यावरील हावभावांमध्ये बदल, शरीरातील थरथरपणा ही लक्षणे रुग्णाला दिसु शकतात. या स्टेजमध्ये व्यक्तीला पार्किन्सन्सची लक्षणे जाणवतात.
रुग्णाला गंभीर लक्षणे : यात स्टेजमध्ये तुम्हाला तुमची सर्व दैनंदिन कामे करता येत नाही. शरीराची हालचाल करण्यास अडथळा निर्माण होतो. स्टेज 4 मध्ये व्यक्तीला वॉकर किंवा इतर उपकरणाशिवाय उभे राहण्यास मदत घ्यावी लागते. या दरम्यान, शरीराच्या, स्नायूंच्या हालचाली देखील खूप मंद होतात. रुग्णाला एकटे सोडणे तुम्हाला महागात पडू शकते. हा पार्किन्सन रोगाचा अंतिम टप्पा आहे. यात रुग्णाला गंभीर लक्षणे दिसतात. यात रुग्णाला उभे राहणे शक्य होत नाही. रुग्णाला व्हीलचेअरची गरज लागेते. तसेच, या टप्प्यात, पार्किन्सन्स असलेल्या व्यक्तीला सतत भ्रम होतो.
वरील माहितीची ईटीव्ही पुष्टी करत नाही. वाचकांना माहिती स्वत: पडताळू खात्री करावी किंवा अधिक माहितीसाठी डॅाक्टरांशी संपर्क करावा.