ETV Bharat / state

खोतकर-उद्धव ठाकरेंच्या बैठकीमधील उपस्थिती राजकीय नाही - पंकजा मुंडे - UDDHAV THACKERAY,

उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर घेतलेली भेट राजकीय नाही... मंत्री पंकजा मुंडेंचे खोतकरांसह मातोश्रीवरील उपस्थितीवर स्पष्टीकरण.... खोतकरांच्या आग्रहाने जालन्याच्या जागेचा तिढा कायम

पंकजा मुंडे
author img

By

Published : Mar 17, 2019, 9:19 AM IST

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत जालन्याच्या जागेवरून निवडणूक लढवण्याबाबत, आज मातोश्री येथे अर्जून खोतकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीला पंकजा मुंडेदेखील उपस्थित होत्या. मात्र, ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले आहे. तर खोतकर यांनीही जालन्यातून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जालन्याच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

जालन्याच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी राज्यमंत्री अर्जून खोतकर हे स्वतः शनिवारी 'मातोश्री'वर दाखल झाले होते. त्यानंतर मंत्री पंकजा मुंडे या देखील मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या.

पंकजा मुंडे

दरम्यान, बैठक संपवून बाहेर पडल्यावर मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबतची ही भेट ही राजकीय भेट नव्हती. आमचे चांगले संबंध आहेत. मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला येथे आले होते. त्यांना मी सभांच्या संदर्भात निमंत्रण दिले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आता निघाले.’ ‘ही बैठक जालना संदर्भातील नसून, आज सीट्स घोषित झाल्यावर कळेल कोणत्या जागांवर कोण आहे ते कळेल’, असं पंकजा यावेळी म्हणाल्या.

पंकजा यांच्यापाठोपाठ काही वेळानेच अर्जुन खोतकरही मातोश्रीवरुन बाहेर पडले. ‘मी जालन्यातून लढण्याचा प्रस्ताव पक्षप्रमुखांना दिला आहे’ यासंदर्भात त्यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून, रविवारी औरगाबाद येथे होणाऱ्या प्रचारसभेला त्यांनी मला बोलवले आहे. उद्या सकाळी(रविवारी) ११ वाजता ते आपला निर्णय जाहीर करतील,'' असे अर्जून खोतकरांनी सांगितले. त्यामुळे मातोश्रीवरील आजच्या बैठकीतून काहीच ठोस तोडगा निघाला नसून, जालना प्रश्न आणखी चिघळला आहे.

Intro:Body:MH_UTPM_meet_matoshri16.3.19
उद्धव ठाकरेंची भेट ही राजकीय भेट नव्हती

मुंबई: आगामी लोकसभा निवडणूकीत जालन्याच्या जागेवरुन निवडणुक लढवण्याबाबत, आज मातोश्री येथे अर्जून खोतकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीला पंकजा मुंडेदेखील उपस्थित होत्या. बैठक संपवून बाहेर पडल्यावर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबतची ही भेट ही राजकीय भेट नव्हती. आमचे चांगले संबंध आहेत. मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला येथे आले होते. त्यांना मी सभांच्या संदर्भात निमंत्रण दिले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आता निघाले.’ ‘ही बैठक जालना संदर्भातील नसून, आज सीट्स घोषित झाल्यावर कळेल कोणत्या जागांवर कोण आहे ते कळेल’, असं पंकजा यावेळी म्हणाल्या. पंकजा मुंडे या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधील समन्वयक आहेत.

दरम्यान, पंकजा यांच्यापाठोपाठ काही वेळानेच अर्जुन खोतकरही मातोश्रीवरुन बाहेर पडले.. ‘मी जालनातून लढण्याचा प्रस्ताव पक्षप्रमुखांना दिला आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे मातोश्रीवरील आजच्या बैठकीतून काहीच ठोस तोडगा निघाला नसून, जालना प्रश्न आणखी चिघळला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.