ETV Bharat / state

एकनाथ खडसेंना राज्यसभेची उमेदवारी मिळायला हवी होती... - rajyasabha

राज्यसभेसाठी भाजपने ज्या उमेदवारांची नावे दिली ते योग्यच आहे. मात्र, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना संधी मिळेल अशी आशा होती परंतु, त्यांचे नाव यादीत नाही. पक्षाने त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन आखला असेल, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

एकनाथ खडसेंना राज्यसभेची उमेदवारी मिळायला हवी होती

author img

By

Published : Mar 12, 2020, 9:18 PM IST

मुंबई - भाजपकडून राज्यसभेच्या तीन उमेदवारांची यादी नवी दिल्लीत प्रसिद्ध करण्यात आली असून यात चर्चेत असलेले एकनाथ खडसे यांना डावलण्यात आले आहे. याबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली. यासंदर्भात मुंडे यांनी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांच्याशी खास बातचीत केली.

ईटीव्ही भारतशी बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे

औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, नाथाभाऊ यांनाही उमेदवारी मिळायला हवी होती, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुंडे यांचेही नाव विधान परिषदेसाठी चर्चेत होते. मात्र, अंबरीश पटेल यांच्या गळ्यात परिषदेची माळ पडली आहे. याबाबत विचारणा केली असता मुंडे म्हणाल्या की, मी पक्षाकडून कोणतीही मागणी केली नाही. मात्र, नाथाभाऊ यांना राज्यसभेवर संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र, त्यांचे नाव यादीत नाही. नाथाभाऊंसाठी पक्षाने काही वेगळा विचार केला असेल. अजूनही मी भाजपमध्ये आहे, कामही करतच आहे, बघूया पुढे काय होते, असा नाराजीचा सूरही पंकजा मुंडे यांनी काढला.

हेही वाचा - वाचा! सहा वर्षात किती लाखांनी वाढली शरद पवारांची संपत्ती

हेही वाचा - रोममध्ये अडकले १०२ भारतीय विद्यार्थी; मदतीसाठी सरसावले पृथ्वीराज चव्हाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.