मुंबई : दक्षिण मुंबई शिवसेना वाढवण्यास पांडुरंग सकपाळ यांचा मोठा हातभार आहे. गेल्या बारा वर्षांपासून सकपाळ हे सक्रिय विभाग प्रमुख काम करत होते. शिवसेनेत पडलेल्या गटबाजी नंतरही दक्षिण मुंबईत पांडुरंग सपकाळ यांनी गड राखला. शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकारणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले पांडुरंग सकपाळ यांना हटवून त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची निवड केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये तशी माहिती प्रसिद्धकरिता दिली आहे. खासदार अरविंद सावंत यांच्या दबावाचे राजकारण यामागे असल्याची चर्चा विभागात सुरू आहे.
राज्यपालांविरोधात आक्रमक आंदोलन : दक्षिण मुंबई आंदोलनाचा आक्रमक चेहरा म्हणून पांडुरंग सपकाळ यांची ओळख आहे. अनेक, आंदोलन त्यांनी गाजवली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर युवा प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी राज्यपालांविरोधात सातत्याने आक्रमक आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन केले होते. धोती फेडो, पेटारा आंदोलन चांगलेच व्हायरल झाले होते.
कुलाब्यात अजान स्पर्धा : महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी जोरदार टीका भाजपने करायला सुरुवात केली. भाजप शिवसेनेचे हिंदुत्वावर आक्षेप घेत असतानाच सकपाळ यांनी कुलाबा मतदारसंघांमध्ये अजान स्पर्धेचे आयोजन केले होते. सकपाळ यांनी या स्पर्धेचे पाठराखण केल्याने शिवसेनेचे कोंडी करण्यासाठी आयते कोलीत मिळाले होते.
कोण आहेत संतोष शिंदे : कुलाबा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना उपविभाग प्रमुख म्हणून संतोष शिंदे यांनी यापूर्वी काम पाहिले आहे. खासदार अरविंद सावंत यांच्या जवळचे म्हणून ते परिचित आहेत. त्यामुळे शिंदे यांची विभाग प्रमुख पदी बढती देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या बारा वर्षापासून विभाग प्रमुख म्हणून काम करत होतो. सध्या सर्वच विभाग प्रमुखांची बदली केली जात आहे. त्यामुळे संतोष शिंदे यांची निवड केली आहे. माझी कोणतीही नाराजी नाही. पक्षप्रमुखांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे, असे पांडुरंग सकपाळ यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : पोलिसांना धक्काबुक्की भोवली! ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक