ETV Bharat / state

Padma Awards २०२१ : महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान - जसवंतीबेन जमनादास पोपट पद्मश्री

भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची यादी काल (सोमवार) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाली. यात 6 महाराष्ट्रीयन नागरिकांचाही समावेश आहे.

पद्मश्री
पद्मश्री
author img

By

Published : Jan 26, 2021, 6:52 AM IST

Updated : Jan 26, 2021, 11:43 AM IST

मुंबई : भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची यादी काल (सोमवार) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाली. यावर्षी एकूण 119 जणांना पद्म पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात 29 महिलांचा समावेश आहे. याशिवाय 10 परदेशी नागरिक, 16 जणांना मरणोत्तर पुरस्कार आणि एका तृतीयपंथीयाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यात 6 महाराष्ट्रीयन नागरिकांचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्ती

कवी नामदेव चंद्रभान कांबळे, पद्मश्री (साहित्य)

रजनीकांत देविदास श्रॉफ – पद्मभूषण (व्यापार)

परशुराम आत्माराम गंगावणे – पद्मश्री (कला)

जसवंतीबेन जमनादास पोपट – पद्मश्री (व्यापार आणि व्यवसाय)

गिरिश प्रभुणे – पद्मश्री (सामाजिक काम)

सिंधुताई सपकाळ – पद्मश्री (सामाजिक काम)

नामदेव चंद्रभान कांबळे, पद्मश्री (साहित्य)

वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक, कवी नामदेव चंद्रभान कांबळे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सन्मानाचा पद्मश्री पुरस्कार (साहित्य) जाहीर झाला आहे. यापूर्वी कांबळे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे नामदेव कांबळे यांचा १ जानेवारी १९४८ यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिरपूर येथून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसला प्रवेश मिळवला. मात्र प्रथम वर्षातच त्यांना अपयश आले. त्यामुळे साहित्य क्षेत्राकडे वळलेले कांबळे यांनी मागे वळून पाहिले नाही. १९७७ कांबळे हे विशिममधील राणी लक्ष्मीबाई विद्यालयात शिपाई म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी आपले शिक्षणही सुरूच ठेवले.

कादंबरी, कविता, साहित्य लिखाण त्यांनी सुरूच ठेवले. 'राघववेळ' ही त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी. या कादंबरीला १९९५ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याच कादंबरीला ह. ना. आपटे, बा. सी. मर्ढेकर व ग. त्र्यं. माडखोलकर पारितोषिकही मिळाले. कांबळे यांचे २२ पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यांच्या साहित्य लेखनासाठी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. त्यासह त्यांच्या राघववेळ या कांदबरीचा बंगाली अनुवाद 'रघबेर दिनरात' प्रकाशीत झाला आहे. त्यासह त्यांच्या उनसावली, मोराचे पाय, कृष्णार्पण, सांजरंग या कादंबऱ्यांनाही पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच त्यांचा महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांवरचा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. साहित्यक्षेत्रातील या कामगिरीची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सिंधुताई सपकाळ – पद्मश्री (सामाजिक काम)

महाराष्ट्रातील 6 जणांपैकी दोघे सामाजिक क्षेत्रातील दिग्गज आहेत. यात एक म्हणजे सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ त्यांच्या अनाथ मुलांसाठी केलेल्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना अनाथांची आई असेही संबोधले जाते.

सिंधुताई यांनी अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 मध्ये त्यांनी पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण गावात ही संस्था सुरु केली. त्यांनी त्यांची मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदनमध्ये दाखल केले आणि इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.

या संस्थेत लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही मार्गदर्शनही दिले जाते. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींच्या विवाहासाठी देखील ही संस्था पुढाकार घेते. आतापर्यंत या संस्थेत अशी सुमारे हजार मुले शिक्षण घेवून बाहेर पडली आहेत.

रजनीकांत देविदास श्रॉफ हे एक अब्जाधीश उद्योगपती आहेत. राजू श्रॉफ या नावाने ते ओळखले जातात. ते फॉस्फरस लिमिटेड या केमिकल कंपनीचे संस्थापक आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार ते भारतातील 87 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

गिरिश प्रभुणे – पद्मश्री (सामाजिक काम)

गिरीश प्रभुणे यांनी पारधी आणि भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे काम केले आहे. यमगरवाडी व मगरसांगवी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी या समाजातील शिक्षणाचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. अनेक कुटुंबांचे त्यांनी पुनर्वसनही केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाचे परशुराम गंगावणे यांना कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या ही लोककला जपून समाजामध्ये जनजागृती आणि प्रबोधन केल्यामुळे गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

जसवंती जमनादास पोपट

जसवंती जमनादास पोपट या महाराष्ट्रातील प्रसिद्ध लीज्जत पापडच्या संस्थापक आहेत. मुंबईच्या रहिवासी असलेल्या जसवंती जमनादास पोपट यांनी आपले घर चालवण्यासाठी उत्पन्नाचे साधन म्हणून 1959 मध्ये पापड लाटण्याचे काम सुरू केले. जसवंती बेन गरीब कुटुंबातून आल्या होत्या. त्यामुळे त्यांचे शिक्षण देखील कमी होते. मात्र त्यांच्यातील व्यवहार ज्ञान आणि व्यापाराची समज चांगली होती. त्यातूनच त्यांनी आपल्या या कामात आणखी 6 गरीब बेरोजगार महिलांच्याही हाताला काम दिले. त्यावेळी त्यांनी 80 रुपये कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला. 15 मार्च 1959 रोजी त्यांनी लिज्जत पापडचा व्यवसाय सुरू केला. पापड उद्योगातून त्यांनी अनेकांना मुख्यत: महिलांना रोजगार दिला आहे.

Last Updated : Jan 26, 2021, 11:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.