ETV Bharat / state

'पालघर प्रकरणात एकही 'मुस्लीम' व्यक्ती नाही; जातीचा रंग देणे दुर्दैवी'

देशमुख म्हणाले, स्पेशल आयजीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी होत आहे. दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल, आज संपूर्ण राज्यात आपण कोरोनाविरोधात लढाई लढत आहोत. यामध्ये जातीचे राजकारण करण्याची वेळ नाही, तर एकत्र येऊन कोरोनाविरोधात लढा देण्याची गरज आहे. मात्र, अशा परिस्थितीत सुद्धा काही लोक 'मुंगेरीलाल के हसीन सपने' बघत असल्याचा टोला त्यांनी पालघर प्रकरणावरून राजकारण करणाऱ्यांना लगावला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Apr 22, 2020, 9:56 AM IST

मुंबई - पालघर प्रकरणा संदर्भात घटनेच्या 8 तासानंतर 101 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. बाजूच्या जंगलात ते लपले होते. तेथून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, यापैकी एकही मुस्लीम धर्माची व्यक्ती नाही. तरीही या घटनेला जातीच्या राजकारणाचा रंग देण्यात आला, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. त्यांनी आज फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला. पालघर प्रकरणातील ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व 101 जणांच्या नावांची यादी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

देशमुख म्हणाले, स्पेशल आयजीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी होत आहे. दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल, आज संपूर्ण राज्यात आपण कोरोनाविरोधात लढाई लढत आहोत. यामध्ये जातीचे राजकारण करण्याची वेळ नाही, तर एकत्र येऊन कोरोनाविरोधात लढा देण्याची गरज आहे. मात्र, अशा परिस्थितीत सुद्धा काही लोक 'मुंगेरीलाल के हसीन सपने' बघत असल्याचा टोला त्यांनी पालघर प्रकरणावरून राजकारण करणाऱ्यांना लगावला आहे.

हेही वाचा - 'कोरोनासाठीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार'

तर ज्या वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली होती. त्यांचा आज (बुधवारी) दुपारी क्वारंटाईन कालावधी संपत आहेत. यानंतर त्यांना सीबीआय च्या ताब्यात देण्यात येणार आहे. याबाबत सीबीआयला सुचित करण्यात आले असल्याचेही गृहमंत्री यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.