मुंबई Padmanabhan Acharya Passed Away : पद्मनाभन बाळकृष्ण आचार्य हे एमजीएम कॉलेजच्या 1948-50 च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते. 1948 मध्ये 'आरएसएस'वर बंदी घातल्यानंतर आचार्य फार मोठे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांना सरकारने 6 महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले होते. (Bharatiya Vidyarthi Parishad)
पाच राज्यांचे राज्यपाल म्हणून पदभार : नरेंद्र मोदी हे 1995 ते 2001 दरम्यान भाजपा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत होते. त्यावेळी पद्मनाभन आचार्य यांनी भाजपाचे राष्ट्रीय सचिव म्हणून काम केलं होतं. त्या काळात मोदी यांच्याकडे उत्तर भारतातील ५ राज्यांची जबाबदारी होती. तर पद्मनाभन आचार्य यांच्याकडे ईशान्येकडील राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आचार्य यांनी नागालँड, त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
आज अंतिम संस्कार: पद्मनाभन आचार्य यांची अंतिम यात्रा त्यांच्या मुंबईतील वर्सोवा येथील निवासस्थानाहून सायंकाळी निघणार आहे. ओशिवरा येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
भाजपात भूषविली अनेक पदे : राज्यपाल होण्यापूर्वी पद्मनाभन बालकृष्ण आचार्य यांनी भाजपात विविध पदे भूषवली होती. 1980 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. 1987 मध्ये त्यांची उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि नंतर 1989 मध्ये ते मुंबई भाजपाचे समिती सदस्य बनले. 1991 मध्ये, ते भारतातील अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि नागालँड या ईशान्येकडील राज्यांच्या प्रभारी भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडले गेले. ते भाजपाचे अखिल भारतीय राष्ट्रीय सचिव आणि 1995-2002 पर्यंत पूर्वोत्तर राज्यांचे प्रभारी देखील होते.
'या' कार्यातही स्वत:ला वाहून घेतले : 2002 मध्ये, पद्मनाभन बालकृष्ण आचार्य हे केरळ आणि लक्षद्वीप आणि 2005 मध्ये तामिळनाडूच्या प्रभारासह राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य होते. आचार्य हे एससी/एसटी मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी आणि 'ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपा' आणि ईशान्य भारत संपर्क सेलच्या राष्ट्रीय प्रभारीचे सह-संयोजक होते. आचार्य ईशान्येकडील आदिवासी मुलांसाठी 'माय होम इज इंडिया'मध्ये सक्रियपणे कार्यरत होते. ज्यांना मुंबई शहरातील कुटुंबांनी शैक्षणिक हेतूने आमंत्रित केलं होतं. त्यांच्या निवासस्थानी अनेक विद्यार्थी अनेक वर्षे (1969-79) राहत होते.
हेही वाचा:
- BMC Demolishes Silver Smelting unit : सोनं चांदी वितळवण्याच्या कारखान्यांच्या चिमण्या उद्ध्वस्त, 5 हजार कोटींहून अधिक नुकसान, सोनं व्यापारी चिंतेत
- Anandacha Shidha : दिवाळीतही सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' वेळेवर नाहीच
- Hottest Climate On Earth : पर्यावरण बदलानं वाढला 'ताप'; जगभरात तापमान वाढल्यानं अनेक नागरिकांचा उष्माघातानं घेतला बळी