मुंबई Oxygen Plant Scam : कोविड काळात ऑक्सीजन जनरेशन प्लांटची उभारणीमध्ये 6 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी, आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) अधिकारी प्रिनाम परब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २२ नोव्हेंबरला नागपाडा पोलीस ठाण्यात (Nagpada Police Station) रेमिन छेडा (Romin Chheda) याच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम 418, 465, 467, 468, 471, 218, 120 ब आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने समन्स पाठवून २३ नोव्हेंबरला आरोपी रोमिन छेडा याला चौकशीला बोलावले होते.
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी : तब्बल आठ तास रोमिन छेडा याचा जबाब नोंदवल्यानंतर पुन्हा २४ नोव्हेंबरला चौकशीला बोलवण्यात आले होते. नंतर २४ नोव्हेंबरला चौकशीअंती आर्थिक गुन्हे शाखेने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आरोपी रोमिन छेडाला अटक केली. दोन वेळा पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आज कोर्टाने छेडाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी हायवे इन्फ्रा कंस्ट्रक्शनच्या संचालक नवनीत अगरवाल यांना उत्तर प्रदेशात EOWने समन्स पाठवला आहे. जर समन्स मिळाल्यानंतर दिलेल्या मुदतीत हायवे इन्फ्रा कन्स्ट्रक्शनचे संचालक मुंबईत चौकशीसाठी न आल्यास EOW चे पथक उत्तर प्रदेशमध्ये जाणार असल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
महापालिकेकडून १३५ कोटींचे कंत्राट घेतले : उत्तर प्रदेशातील हायवे इन्फ्रा कंस्ट्रक्शन ही कंपनी असून त्याचे संचालक नवनीत अगरवाल हे प्रयागराज येथे राहतात. तसेच हायवे इन्फ्रा कंस्ट्रक्शन या कंपनीच्या नावे अटक आरोपी रोमिन छेडा याने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे महापालिकेकडून १३५ कोटींचे कंत्राट घेतले होते. जून २०२१ मध्ये हायवे इन्फ्रा कंस्ट्रक्शन या कंपनीच्या नावाने कंत्राट मिळाले होते. नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीसाठी जी दोन कंत्राटी दिली होती. त्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या नऊ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीच्या कंत्राटाचे काम हे संबंधित साईट कंत्राटदाराच्या ताब्यात दिल्यापासून, 30 दिवसात पूर्ण करावयाची अट संबंधित निविदेत नमूद होती. मात्र या अटीप्रमाणे कंत्राटदार हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीकडून 30 दिवसांत काम पूर्ण न झाल्याने त्यांना निविदेतील अटी शर्तीनुसार मुंबई महानगरपालिकेने एकूण तीन कोटी 16 लाख 32 हजार 426 रुपयांचा दंड आकारला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एका महिन्यासाठी ३ कोटी दंड : महापालिकेने जूनला हायवे इन्फ्रा कंस्ट्रक्शनला कंत्राट देऊन जुलैमध्ये काम पूर्ण न करता ऑगस्टमध्ये पूर्ण केल्याचे दाखवून, केवळ एक महिना उशीर केल्याने तीन कोटी 16 लाख 32 हजार 426 रुपयांचा दंड आकारला. मात्र, प्रत्यक्षात हायवे इन्फ्रा कन्स्ट्रक्शनने ऑक्टोबर महिन्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीचे काम पूर्ण केले होते. त्यामुळे वास्तविक पाहता महापालिकेने हायवे इन्फ्रा कन्स्ट्रक्शन या कंपनीला तीन महिने प्लांट उभारण्यास उशीर केल्याप्रकरणी जवळपास ९ कोटींचा दंड न आकारता केवळ एका महिन्यासाठी ३ कोटी दंड आकारल्याचा आरोप करण्यात आला होता.
९ पथके चौकशीसाठी रवाना : हायवे इन्फ्रा कन्स्ट्रक्शन या कंपनीला वी एन देसाई रुग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, जीटीबी रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, नायर रुग्णालय, कुपर रुग्णालय, भाभा रुग्णालय, के एम रुग्णालय आणि सायन रुग्णालय अशी रुग्णालये कंत्राटदाराच्या ताब्यात देऊन ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीसाठी देण्यात आली होती. या नऊ रुग्णालयांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेची ९ पथके चौकशीसाठी आज रवाना झाली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज या नऊ रुग्णालयांत जाऊन चौकशी आणि तपास केला.
हेही वाचा -