ETV Bharat / state

बाप्पा निघाले गावाला...मुंबईत यंदा १ लाख ३५ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन - Mayor Kishori Kishor Pednekar news

कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता गणपती विसर्जनादरम्यान योग्‍य ती खबरदारी घ्यावी, त्‍यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपाल‍िकेने कोविडबाबतची आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेत निरनिराळ्या उपाययोजना केल्‍या होत्‍या.

मुंबईत १ लाख ३५ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

author img

By

Published : Sep 2, 2020, 5:06 PM IST

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. या उत्सवादरम्यान एकूण १ लाख ३५ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी कृत्रिम तलावात ७० हजार २३३ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. विसर्जन सोहळा शांततेत पार पडल्याने सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळे, गणेशोत्‍सव समन्‍वय समिती, विविध यंत्रणा यांच्‍यासह मुंबईकर जनतेचे महापौर किशोरी पेडणेकर व महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी विशेष आभार मानले आहेत.

मुंबईनगरीत दहा दिवसांपूर्वी आगमन झालेल्या गणरायाला मुंबईकरांनी काल १ सप्टेंबरला भावपूर्ण वातावरणात शांततेत तसेच सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन निरोप दिला. यंदाचा गणेशोत्‍सव उत्‍साहात साजरा करताना, कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता योग्‍य ती खबरदारी घ्यावी, त्‍यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपाल‍िकेने कोविडबाबतची आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेत निरनिराळ्या उपाययोजना केल्‍या होत्‍या.

सर्व नागरिकांनी मास्‍कचा वापर करणे, सुरक्षित दूरीकरण राखणे, गणपती मूर्तींची उंची मर्यादीत राखणे, मिरवणुका टाळणे, महानगरपालिकेने ठिकठिकाणी व्‍यवस्‍था केलेल्‍या मूर्ती संकलन केंद्रांवर मूर्ती सोपविणे, सर्व विभागांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या कृत्रि‍म तलावांमध्‍ये तसेच शक्‍यतो घरच्‍या घरी मूर्ती विसर्जन करणे अशा निरनिराळ्या सूचनाही महानगरपालिका प्रशासनाकडून करण्‍यात आल्‍या होत्‍या. या सर्व आवाहनांना नागरिकांनी, सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी प्रतिसाद दिला. यातून मुंबईकरांची एकजूट आण‍ि सहकार्याची भावना पुन्‍हा एकदा सर्वांनी अनुभवली. त्‍याचे अनुकरण इतरांनी करावे असे महापौर व आयुक्‍तांनी म्हटले आहे.

विविध यंत्रणांचे आभार -

मुंबईकर जनतेसमवेत महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करणारे पोलीस दल, वाहतूक पोलीस, नौदल, इतर शासकीय व निम-शासकीय यंत्रणा, तटरक्षक दल, हॅम रेडिओ, सर्व प्रसारमाध्यमे, खासगी तसेच सेवाभावी संस्था यांचेही महापौर व महापालिका आयुक्तांनी आभार मानले आहेत.

अशी केली होती व्यवस्था -

गणेशोत्‍सवामध्‍ये मुंबईकरांच्‍या सेवेसाठी महानगरपालिका प्रशासनाने आवश्‍यक ती सर्व यंत्रणा उभी केली होती. ७० नैसर्गिक व १९९ कृत्रि‍म तलावांच्‍या ठिकाणी मूर्ती संकलन करुन विसर्जनाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. विविध चौपाट्यांवर ७८६ स्‍टील प्‍लेट लावण्‍यात आल्‍या होत्‍या. एकूण २३७ स्‍वागत कक्ष आण‍ि २१९ नियंत्रण कक्ष उभारले होते. ८१२ जीवरक्षक, १४२ मोटरबोट, १५४ प्रथमोपचार केंद्र, ८१ रुग्‍णवाहिका, १३० तात्‍पुरती शौचालये, ४२० निर्माल्‍य कलश, ३३८ निर्माल्‍य वाहन, ३ हजार ६५८ प्रखर झोताचे विद्युत दिवे, ३६३ सर्च लाईट, ४७ निरीक्षण मनोरे, ४३ जर्मन तराफा आदींचा त्‍यात समावेश होता. ठिकठिकाणी आवश्‍यकतेनुसार विद्युत तसेच संरक्षक कठडे यांची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती.

२ लाख ९९ हजार किलोग्रॅम निर्माल्य -

मूर्ती संकलन व विसर्जनानंतर, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाने विसर्जन स्थळांवरील निर्माल्य संकलित करण्याचे कामकाज केले. गणेशोत्‍सवात मिळून एकूण २ लाख ९९ हजार २७६ किलोग्रॅम इतके निर्माल्‍य संकलित करण्‍यात आले. विविध ३४ ठिकाणी या निर्माल्‍यावर शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्रक्रिया करण्‍यात आली. या संपूर्ण व्‍यवस्‍थेमध्‍ये महानगरपालिका प्रशासन तसेच बिगर शासकीय संस्‍था असे सुमारे १९ हजार ५०३ कामगारांचे हात राबत होते. तर, ३ हजार ९६९ अधिकारी ही सारी व्‍यवस्‍था प्रशासकीय कामकाजासह सांभाळत होते.

हेही वाचा - राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ घरात राहणारे मुख्यमंत्री, भाजपचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.