मुंबई - मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. शनिवारी मुंबईत 64 हजार 186 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 13 लाख 30 हजार 573 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत काल 64 हजार 186 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 60 हजार 759 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 427 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 13 लाख 30 हजार 573 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 11 लाख 70 हजार 690 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 59 हजार 883 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 52 हजार 885 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 64 हजार 065 फ्रंटलाईन वर्कर, 5 लाख 89 हजार 077 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 2 लाख 24 हजार 566 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 31 हजार 987 तर आतापर्यंत 8 लाख 74 हजार 206 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 5 हजार 245 लाभार्थ्यांना तर एकूण 76 हजार 782 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 26 हजार 954 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 3 लाख 79 हजार 585 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2 लाख 52 हजार 865
फ्रंटलाईन वर्कर - 2 लाख 64 हजार 065
जेष्ठ नागरिक - 5 लाख 89 हजार 077
45 ते 59 वय - 2 लाख 24 हजार 566
एकूण - 13 लाख 30 हजार 573
हेही वाचा - आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, सचिन वाझे यांच्या भावाची प्रतिक्रिया
हेही वाचा - अब्जाधीश राधाकिशन दमानी यांचे एक हजार एक कोटी रुपयांचे नवीन घर